fact check
fact check 
मुंबई

FACT CHECK : सोशल मीडियावरील कोरोनाबाबतचे हे दावे ठरलेत खोटे!

सकाळ वृत्तसेवा

सध्या ज्या वेगाने कोरोनाचा फैलाव जगभर होत आहे, त्याच वेगाने कोरोनाबाबतच्या अफवा पसरल्या जात आहे. सोशल मीडियातून अनेक खोट्या बातम्या व्हायरल होत आहे. त्या अफवांचा अनेकांनी धसका घेतल्याचेही समोर आले. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीवर लगेच विश्वास न ठेवता ती पडताळली पाहिजे. सध्या कोरोना संबंधित काही खोट्या बातम्या चांगल्याच व्हायरल होत आहे. त्यापैकी काही टॉप फाईव्ह अफवा.. 

रतन टाटांच्या नावाने फिरणारी पोस्ट खोटी
सध्या सोशल मीडियावर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात टाटा म्हणतात की, 'कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मला या तज्ज्ञांबद्दल फारसे माहिती नाही, परंतु मला नक्कीच हे माहित आहे की या तज्ज्ञांना प्रेरणा आणि मूल्यांबाबत फारशी माहिती नाही'.  तसेच, या पोस्टमध्ये देशातील आणि जगातील अनेक घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. आतापर्यंत आलेल्या संकटातून जगाने कसा मार्ग काढला. ही पोस्ट रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल केली जात आहे. मात्र, रतन टाटा यांनी ट्वीट करून, ही पोस्ट मी लिहीलीच नसून ती खोटी असल्याचे सांगितले आहे.

हायड्रॉक्सिक्लोरिक्वीन हे कोरोनावरील उपचार नाही
जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना या महाभयंकर आजारापुढे सर्वच देश हतबल झाले आहे. मात्र याच वेळी भारत देश हा आशेचा किरण ठरू पाहत आहे. हायड्रॉक्सिक्लोरिक्वीन या औषधासाठी अनेक देश भारताकडे मागणी करू लागलेत. दरम्यान, याकाळात हायड्रॉक्सिक्लोरिक्वीन औषधांबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. कोरोनावर एकमेव इलाज म्हणून या औषधांचा वापर केला जाऊ शकतो, असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला. त्यामुळे अनेकांनी मेडिकल स्टोअर्समध्ये या गोळ्यांची मागणी करू लागले आहेत. मात्र कोरोनावर हायड्रॉक्सिक्लोरिक्वीन हा एकमेव उपाय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ही औषधे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असून त्याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच केला जातो. प्रामुख्याने मलेरियासाठी असलेले हे सध्या कोरोनापासून बचावासाठी डॉक्टर्स, नर्स, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. 

लसणामुळे कोरोना होत नसल्याचा दावा खोटा 
सद्या कोरोना आजारामुळे अनेकजण खबरदारी घेताना दिसत आहे. या संकटसमयी समाज माध्यमात अनेक सल्लावजा माहिती व्हायरल होत आहे. कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये, याबाबतचे अनेक मेसेज व्हायरल होत आहे. त्यातही लसूण हा खाल्ल्याने कोरोनाची बाधा होत नाही, अशा आशयाचा मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र लसणामध्ये औषधी गुणधर्म असले तरीही लसणामुळे कोरोना होत नाही, हा दावा मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी फेटाळला आहे.

जेवणाची भांडी उष्टी करणारा व्हिडिओ पाकिस्तानातील
देशात कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रम कारणीभूत ठरला, असा आरोप सर्वत्र केला जात आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव करण्यासाठी दिल्लीतील तब्लिगीकडून जाणीवपूर्वक हे कृत्य केले जात असल्याचा दावा करण्यात आला. मात्र या व्हिडिओबाबत सत्यता पडताळली असता हा व्हिडिओ भारतातील नसून पाकिस्तानातील असल्याचे पुढे आले आहे.

इटलीतील मृतदेहांचा फोटो बनावट
जगभर कहर माजावणाऱ्या कोरोनाने इटलीत सुद्धा थैमान घातला. हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियात एक फोटो चांगलाच व्हायरल झाला. इटलीतील एका चौकात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा खच पडलेला दाखवण्यात आला. मात्र, या फोटोची खात्री केली असता तो जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथील एका कला प्रदर्शनातील असल्याचे त्यांनी सिद्ध झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT