मुंबई

"काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का ? सोनिया गांधी उत्तर द्या.."

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आता दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालवायचं का? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. काल संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डबाबत विधान केलं होतं. यामध्ये इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायला मुंबईत येत होत्या, याचसोबत मंत्रालयात अंडरवर्ल्डचे गुंड येत जात असायचे, असं देखील संजय राऊत म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला फैलावर घेत काही गंभीर सवाल उपस्थित केलेत. काँग्रेसने संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं असं देखील फडणवीस म्हणतायत. 

देवेंद्र फडणवीसांचे सवाल : 

काँग्रेस पार्टीचे नवीन सहयोगी, यांच्यासोबत काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रात सरकार तयार केलंय त्या शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक संजय राऊत यांनी जो खुलासा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. संजय राऊत यांनी कालच्या मुलाखतीत इंदिरा गांधी या मुंबईतील पायधुनीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायला येत होत्या. यातून अनेक प्रश्न निर्माण झालेत. आता काँग्रेस पक्षाने हे खरं आहे का? हे सांगावं. अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायला इंदिरा गांधी येत होत्या का ?

याचसोबत देवेंद्र फडणवीस यांनी त्याकाळी काँग्रेस अंडरवर्ल्डच्या पैशांवर निवडणूक जिंकत होत्या का ? काँग्रेस पार्टीला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का ? काँग्रेस पार्टी अंडरवर्ल्डच्या मसल पावरवर निवडणूक जिंकत होती का ?  छोटा शकील आणि दाऊद हे महाराष्ट्र आणि मुंबई चालवायचे, हे खरं आहे का ? ११६० ते १९८० या दोन दशकांमध्ये मुंबईतील आयुक्तांची नियुक्ती अंडरवर्ल्ड करायचा? याचा देखील खुलासा आता काँग्रेस पार्टीने द्यावा असं फडणवीस म्हणालेत 

त्या काळात हाजी मस्तान आणि अंडरवर्ल्डचे लोकं मंत्रालयात यायचे आणि सेलिब्रिटीज सारखं मंत्रालयात त्यांचं स्वागत व्हायचं याचाही खुलासा काँग्रेस पार्टीने करावा. राजकारणातील गुन्हेगारीकरण करण्याची सुरवात त्या काळापासून झाला का ? म्हणत शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करतात का ? किंवा यावर खुलासा करणार का? आणि राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते गप्प का ? अशी विचारणा केलीये. 

'ते' वक्तव्य मागे

दरम्यान, मोठा गदारोळ झाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे.  

devendra fadanavis targets congress party over ssanjay rauts comment on indira gandhi and underworld

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT