Germany Visa sakal media
मुंबई

GERMANY VISA : बनावट कागदपत्र सादर केल्याने सहा गुन्हे दाखल

मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल

अनिष पाटील

मुंबई : जर्मनीला (Germany) जाण्यासाठी व्हिसा (VISA) मिळावा यासाठी बनावट कागपत्रे (fake documents) सादर केल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी (marine drive police) सहा गुन्हे दाखल (FIR) केले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) इमिग्रेशन विंगने तक्रार केली होती. यामागे एखादे रॅकेट कार्यरत आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. ( fake documents for getting germany visa six cases filed-nss91)

गुजरातचे रहिवासी महेंद्रकुमार रॉड्रेरिया, दक्ष रॉड्रेरिया, मानव रॉड्रेरिया, शोएब मुजावर, कादिर सॅमसुदिनो आणि पंजाब येथील रहिवासी गुरप्रित सिंह, सुरजीतसिंह सुखदेवसिंग आणि बसंत सुखदेवसिंग अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसाय, पर्यटन आणि नोकरीसाठी जर्मनीला जाण्याची इच्छा असलेल्या आरोपी नागरिकांनी जून 2016 ते डिसेंबर 2019 दरम्यान व्हिसा साठी अर्ज केला होता.

जर्मनीच्या फेडरल रिपब्लिकच्या महावाणिज्यदूताने अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केली आणि कागदपत्रांच्या सत्यतेवर शंका उपस्थित केल्यानंतर पुढील पडताळणीसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात मुंबई पोलिसांच्या इमिग्रेशन शाखेकडे प्रकरण पाठवले. आरोपी व्यक्तीने जर्मनीच्या प्रवासासाठी व्हिसा मिळवण्यासाठी नियम आणि अटींचे पालन करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली.

त्यापैकी काहींनी इमिग्रेशनचे बनावट शिक्के वापरून बोगस आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास दाखवला, काहींनी त्यांचे आधीचे प्रवास लपवण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर देशाच्या इमिग्रेशनद्वारे व्हिसा नाकारणे, आणि काहींनी बनावट पासपोर्ट नोंदी सबमिट केल्या आहेत, अशी माहिती पडताळणीत निष्पन्न झाली. विशेष शाखा-2 च्या इमिग्रेशन शाखेच्या प्राथमिक तपासात गुन्हे घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी जर्मन वाणिज्य दूतावासात सादर केलेल्या सहा व्हिसा अर्जासंदर्भात सहा एफआयआर नोंदवले.

तक्रारदार पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार जाधव यांनी गेल्या तीन दिवसात आठ जणांविरोधात कलम 420 (फसवणूक), 465 , 467 , 468 (फसवणुकीच्या हेतूने बनावट कागदपत्रे सादर ) 471 ( बनावट पुरावे ) आणि 474 (बनावट कागदपत्रे ताब्यात घेणे) आदी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. मरीन ड्राइव्ह पोलीस आता संबंधित कागदपत्रांसह आरोपीला चौकशीसाठी मुंबईला बोलावणार आहे. कथित गुन्ह्यात आरोपींना कोणत्याही ट्रॅव्हल एजंटने मार्गदर्शन केले किंवा मदत केली का हे तपासक तपास करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT