Vaccination Sakal
मुंबई

बोगस लसीकरणानंतर मुंबई महापालिकेने बनवली नियमावली

Fake Vaccination Scam in Mumbai New Guidelines issued by BMC

विराज भागवत

मुंबई: शहरात गेल्या काही दिवसांत एकूण 2 हजार 40 जणांना बनावट लसीकरणाचा (Fake Vaccination Scam) डोस देण्यात आला असल्याची माहिती मुंबई पालिकेने (Mumbai BMC) राज्य सरकारला दिली. जून (June 2021) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे बनावट लसीकरण प्रकरण झाले. या प्रकरणावर कोर्टानेदेखील ताशेरे ओढले. त्यानंतर, बनावट लसीकरण झालेल्या नागरिकांना शोधून (Victims of Fake Vaccination) त्यांची नावे केंद्र सरकारला (Central Govt) कळवण्यात येतील. तसेच, त्यांची प्रतिपिंडे (Antibody) तपासून त्या अनुषंगाने त्यांचे जुलैमध्ये लसीकरण करण्यात येईल, असा निर्णय आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केला. त्यानंतर, आता बोगस लसीकरणानंतर मुंबई महापालिकेनेही कडक नियमावली बनवली. (Fake Vaccination Scam in Mumbai New Guidelines issued by BMC)

बोगस लसीकरणानंतर मुंबई महापालिकेने बनवली नियमावली

  • लसीकरणापूर्वी मुंबई महापालिकेच्या संबंधित आरोग्य अधिका-यांना आणि पोलिस स्टेशनला ३ दिवस आधी माहिती देणं आवश्यक

  • रजिस्टर खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरद्वारेच लसीकरण मोहीम राबवावी.

  • कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर कोविन पोर्टलवर रजिस्टर आहे की नाही हे पहावे.

  • सोसायटीने सेक्रेटरीची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करावी.

  • लसीची किंमत, तारीख, खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरची माहिती जाहीर करणे बंधनकारक.

  • आरोग्य अधिकाऱयांनी लसीकरणाच्यावेळी अचानक भेट द्यावी.

  • लसीकरणादरम्यान काही गडबड आढळल्यास आरोग्य अधिका-यांने किंवा नोडल ऑफिसरने तात्काळ पोलिसांना किंवा वॉर रूमला कळवावे

  • लस घेतल्यानंतर प्रमाणपत्राची प्रत्येकाला लिंक उपलब्ध होईल याची नोडल ऑफिसरने खबरदारी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत मोठा निर्णय ! शेल्टर होममध्ये ठेवता येणार नाही, नसबंदी हाच योग्य उपाय

AUS vs SA 2nd ODI: १९८७ नंतर वन डेत चमत्कार! भारताच्या दिग्गजानंतर 'हा' पराक्रम करणारा मॅथ्यू ब्रित्झके दुसराच फलंदाज ठरला

"आई अचानक आम्हाला सोडून गेली आणि.." ज्योती चांदेकरांच्या लेकीची आईच्या आठवणीत भावूक पोस्ट

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Raisin Trader Fraud : पन्नास लाख रुपयांऐवजी कोऱ्या कागदांचे दिले बंडल, बेदाणा व्यापाऱ्याकडून दिल्लीतून साथीदारांनी उचलली रक्कम

SCROLL FOR NEXT