मुंबई

मुंबईत कंडोमचा वापर झाला दुप्पट; गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर वाढला

सुमित बागुल

मुंबई : देशातील एकूण २२ राज्यांमध्ये एक सर्व्हेक्षण करण्यात आलंय. या सर्वेक्षणातून एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे. या अभ्यासामध्ये भारतामध्ये विवाहित जोडप्यांकडून होणारा गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे.

देशातील एकूण २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधील शहरी भागात हे सर्वेक्षण करण्यात आलं. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत फॅमिली प्लॅनिंगसाठी गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर दुप्पट झाल्याची बाब उघडकीस आली आहे. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांसोबतच महिलांच्या नसबंदीच्या प्रमाणातही घट झाल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. 

मुंबईची आकडेवारी काय सांगते ? 

  • मुंबईतील १० पैकी ७ विवाहित जोडपी पहिल्यापासूनच कुटुंब नियोजनाच्या पद्धतीशी जोडले गेल्याचं दिसून आलं.
  • २०१५-१६ मध्ये कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांची संख्या ५९.६ टक्के होती, २०१९-२० मध्ये हीच आकडेवारी वाढून ७४.३ टक्के झाली
  • यादरम्यान, कंडोमचा वापर ११.७ टक्क्यांवरून वाढून १८.१ टक्के झाला
  • गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाणही ३.१ टक्क्यांवरून कमी होऊन १.९ टक्क्यांवर आलं आहे. 
  • महिला नसबंदीचं प्रमाण ४७ टक्क्यांवरून कमी होत ३६.१ टक्क्यांवर आलं.

मुंबई उपनगरांमधील आकडेवारी काय सांगते? 

  • मुंबई उपनगरांमध्ये पुरुषांमध्ये कंडोमचा वापर हा दुप्पट  झाला.  
  • मुंबई उपनगरांमध्ये  कंडोमचा वावर २०१५- १६ मध्ये ८.९ टक्के होता तो आता २०१९-२० मध्ये वाढून १८ टक्क्यांवर गेला. म्हणजेच कंडोमचा वापर दुप्पट झाला.
  • मुंबई उपनगरांमध्ये महिला नसबंदी प्रमाण ४३ टक्क्यांवरून ३७.५ टक्क्यांवर आलं आहे
  • महत्त्वाची बाब म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाण ५.३ टक्क्यांवरून ०.९ टक्क्यांपर्यंत घसरलं आहे. 

family planning condoms are preferred over contraceptive pills stats of mumbai city

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT