मुंबई

इथली पावभाजी तुम्ही खाल्लीच असेल ! मुंबईतील प्रसिद्ध पावभाजी दुकानातून 100 किलो बटर आणि चीज चोरीला...

अनिश पाटील

मुंबई : शहरातील सुप्रसिद्ध कॅनन पावभाजी केंद्रातून 100 किलो बटर आणि चीज चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्यामुळे तसेच खाण्यासाठी काहीच न मिळाल्यामुळे त्यांनी चोरी केल्याचे चौकशीत सांगितले आहे.

महापालिका मुख्यलयासमोर असलेले कॅनन पावभाजी केंद्र शहरात प्रसिद्ध आहे. गेल्या 48 वर्षांपासून सुरू असलेल्या या केंद्रातील पावभाजी खाण्यासाठी पर्यटक, खवय्ये, मुंबईकर गर्दी करतात. पालिकेने मिलीटर कमिटीला हा गाळ्याचे वितरण केले होते. पी.एन. दांडेकर हे याठिकाणी पावभाजी केंद्र चालवतात. त्यात 25 कामगार कामाला आहेत. दांडेकरांना तीन दिवसांपूर्वी त्यांचे पावभाजी केंद्र फोडल्याचा दूरध्वनी आला होता. तेथून जाणा-या एका नागरीकाने हा दूरध्वनी केला होता. त्यानंतर दांडेकर यांनी याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांकडे तक्रार केली होती.

लॉकडाऊनमध्ये पावभाजी केंद्र बंद असल्यामुळे दांडेकर हे घरीच होते. त्यांनी तातडीने जाऊन केंद्राची पाहणी केली असता ग्रील्स तोडून गाळ्यात चोरटे शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्राथमिक तपासणीत आरोपींनी टेम्पो आणला आणि 80 किलो बटर, 20 किलो चीज व साखरेच्या गोणी लंपास केल्या. एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी  लंपास केलाय. 

याप्रकरणी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांमार्फत तपास केला असता वीस वर्षीय संतोष थापा आणि पंचवीस वर्षीय करण जाधव या स्थानिकांचा यामध्ये सहभाग आढळला. त्यानुसार त्या दोघांनाही रविवारी अटक करण्यात आली. दोघेही फुटपाथवर राहणारे असून भंगार गोळा करतात. त्यांनी चोरीचा काही माल विकला आणि उतरलेले चीज, बटर खाल्ल्याचे चौकशीत सांगितले.

आरोपींनी काही भांडीही चोरली असून ती हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर आणखी एक संशयीताचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोनही आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

( संकलन - सुमित बागुल )

famous pav bhaji shop cannon looted by local boys 100 kg butter and cheese stolen

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT