मुंबई

केंद्रीय कृषी कायद्याबाबत उपमुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट

पूजा विचारे

मुंबईः  केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी दोन वाजता ही बैठक होईल. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. 

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. महाविकास आघाडी सरकारकडूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं मत अजित पवारांनी सांगितलं. आज या कायद्याबद्दल प्राथमिक चर्चा होणार आहे. काही म्हणतील हे बिल संपूर्ण रद्द करा, पण सगळ्यांशी चर्चा करू, एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही. माझी वैयक्तिक भूमिका महाविकास आघाडीची नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीत  शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या दबावाखाली केंद्र बदल करेल असा अंदाज आहे, ते बदल काय असतील त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू, आज पहिल्याच बैठकीत काही निर्णय होणार नाही असंही पवारांनी स्पष्ट केले.

आज राज्य सरकारची कृषी कायद्याबाबत महत्त्वाची बैठक आहे. अधिनियमांतील त्रुटी आणि उणिवांवर या बैठकीत अभ्यास करण्यात येणार आहे. गेल्या २० दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू हे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाले. बाईकवरुन दिल्ली गाठलेल्या बच्चू कडू यांनी सिंघू बॉर्डरवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.  केंद्र सरकारनं लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमधील त्रुटी आणि उणिवांबाबत मंत्रालयात आज चर्चा होईल. मंत्रिमंडळ उपसमितीची ही बैठक आज दुपारी दोन वाजता मंत्रालयात पार पडेल. 

Farmers act 2020 maharashtra governments cabinet ajit pawar meeting

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT