मुंबई

Bharat Bandh : भाजप नेते आशिष शेलार म्हणतात, "मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत"

सुमित बागुल

मुंबई : दिल्लीच्या वेशीवर शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमलेत. अशात आज शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून 'भारत बंद' पुकारला गेलाय. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकरी आंदोलन आणि आज पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'ला पाठिंबा असल्याने महाराष्ट्रात भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. दरम्यान, भाजप नेत्यांकडून आज पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' वर कडाडून टीका केली जातेय. भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी देखील आज पुकारलेल्या 'भारत बंद'ला कडाडून टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत शेतकरी बांधवाना मागील काही गोष्टींची आठवण करून करून दिली आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला? कामगारांना कुणी फसवलं? कामगारांना कुणी उध्वस्त केलं ? कोणी मालकांचे फायदे करुन दिले? माझ्या शेतकरी बांधवानो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत, डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!

farmers protest bharat bandh bjp leader ashish shelar targets Mahavikas aghadi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT