मुंबई

रिलायन्स कार्यालयावर आज शेतकरी संघटनांचा मोर्चा; बच्चू कडू, राजू शेट्टी, जयंत पाटील सहभागी होणार

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 22 : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आज ( 22 डिसेंबर ) रोजी वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स मधल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, स्वाभामानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, हमाल पंचायतीचे प्रमुख बाबा आढव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या सहभागी होणार आहे. 

दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुंबईतही शेतकऱ्यांच्या विवीध संघटना एकत्र येणार आहे. हा मोर्चा  रिलायंन्सच्या कॉर्पोरेट कार्यालयावर धडकणार आहे. वांद्र्यातील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या शेतकरी विरोधी तीनही कायद्यांचे बोलवते धनी अंबानी, अदानी आहेत. दिल्लीच्या सिमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी अदानी, अंबानीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

भविष्यात अंबानी, अदानी समूहाच्या सर्व सेवा आणि उत्पादने शेतकरी नाकारणार असून, देशाच्या खऱ्या मालकांना इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे, असं शेकापचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून या मोर्चाच्या नियोजनासाठी तयारी सुरु होती. 

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातून शेकापचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. तर प्रहारचे बहुतांश कार्यकर्ते मुंबईला पोहोचले आहेत. राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही भागातून मुंबईला येऊन धडकणार आहेत. यामध्ये रविकांत तुपकरांचाही समावेश आहे. सरकारमध्ये राज्यमंत्री असूनही बच्चू कडू या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आलंय. आंदोलन शांततेत झाल्यास अटकाव न करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे अजुनपर्यंत पोलिसांकडून कुणालाही नोटीस दिली नसल्याचे कळते.

farmers protest in mumbai march against ambani and adani farmers organizations are aggressive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT