Dada Bhuse 
मुंबई

Farmers Protest: दादा भुसेंना मंत्रालयात शेतकऱ्यांचा घेराव! आक्रमक झाल्यानं अनेकजण ताब्यात

याचा व्हिडिओ समोर आला असून आक्रमक शेतकऱ्यांशी चर्चा करताना भुसेंना बरीच कसरत करावी लागली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विविध मागण्यांसाठी मंत्रालयात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना घेराव घातला यावेळी जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याकंडून त्यांना धक्काबुक्की देखील झाली. याचा व्हिडिओ समोर आला असून या शेतकऱ्यांशी चर्चा करताना भुसेंना बरीच कसरत करावी लागली. (Farmers Protest rusk with Dada Bhuse in Mantralaya many people were detained for being aggressive)

दादा भुसेंना घेराव!

अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंत्रालयात आंदोलन केलं. यावेळी दादा भुसे यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यााच प्रयत्न केला. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्यानं तसेच घेराव घालताना धक्काबुक्की झाल्यानं काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेण्यात आलं. (Latest Marathi News)

सुरक्षा जाळ्यांवर उड्या घेतल्यानं गोंधळ

दरम्यान, मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळ्यांवर या आंदोलकांनी उड्या घेतल्या. त्यांना वाचवण्यासाठी काही पोलीस कर्मचाऱ्यांनीही उड्या घेतल्या. यामुळं मोठ्या गोंधळ निर्माण झाला होता. मंत्रालयातील मजल्यांवर हा प्रकार बघण्यासाठी कामानिमित्त आलेल्या लोकांनी गर्दी केली होती. (Marathi Tajya Batmya)

काय आहे मागण्या?

१९७२ साली झालेल्या प्रकल्पाचा योग्य मोबदला न मिळल्यानं हे प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. या शेतकऱ्यांनी गेल्या १०३ दिवसांपासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु होतं. मात्र, या आंदोलनाची सरकारनं दखल न घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उद्यापर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा, ठरलेल्या वेळेत उडणार धुरळा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

विश्वविजेता भारतीय संघ ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य संघाला भिडणार; वर्ल्ड कपची तयारी, पण स्मृती मानधना नाही खेळणार?

Mumbai Crime: २० हप्त्यांचे आमिष, २१व्या महिन्यात फसवणूक! वनक्लिककडून गुंतवणूकदारांच्या लाखो रुपयांचा खेळखंडोबा, प्रकरण काय ?

Latest Marathi News Live Update : "मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली... - आशिष देशमुखांची विरोधकांवर टिका

Processed Food Side Effects: तुम्ही पदार्थ खाता की पदार्थ तुम्हाला खातो? प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे स्थूलता,मधुमेह, हृदयरोगाचा धोका

SCROLL FOR NEXT