मुंबई : नाॅनकोव्हिड रुग्णांमध्ये कोरोनाची भीती अजूनही कायम असून अऩेक शासकीय आणि खाजगी रुग्णालयांत हे रुग्ण आपले उपचार व शस्त्रक्रिया पुढे ढकलत आहेत. तसेच, अऩेक रुग्ण रुग्णालयांत जाण्यासही घाबरत असल्याचे समोर आले आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली असली तरी नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 30 ते 40 टक्के एवढेच आहे. रुग्णालयात कोविड आणि नॉन कोव्हिड रुग्णांसाठी वेगळा कक्ष आहेत. तरीही भीतीमुळे अनेक रुग्ण रुग्णालयात न जाता छोट्या छोट्या क्लिनिक्समधून फक्त सल्ला व तिथेच उपचार घेणे पसंद करत आहेत, असे भाटिया रुग्णालयाचे संचालक डॉ. आर. दस्तुर यांनी सांगितले. रुग्णालयात कोरोना महामारीआधी रोज किमान 25 शस्त्रक्रिया होत. आता फक्त 4 ते 5 शस्त्रक्रिया होत असल्याचे त्यांन सांगितले.
जसलोक रूग्णालयात महिन्याला 700 ते 800 शस्त्रक्रिया आणि इतर प्रक्रिया केल्या जायच्या. मात्र, एप्रिल महिन्यात ही संख्या 32 वर आली. मेमध्ये हे प्रमाण 89, जूनमध्ये 157 आणि जुलै महिन्यात 289 एवढ्या शस्त्रक्रिया झाल्या. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात एका महिन्यापूर्वी नॉन कोव्हिड रुग्णांसाठी वेगळे 30 बेड राखीव ठेवले होते. मात्र, तेव्हापासून एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. नानावटी रुग्णालयात दर महिन्याला 600 शस्त्रक्रिया होत. एप्रिलमध्ये हे प्रमाण 78 टक्क्यांनी कमी झाले आहे. मे महिन्यात 82 टक्के, जुन मध्ये 81 टक्क्यांनी शस्त्रक्रिया कमी झाल्या.
तातडीने उपचार आवश्यक
मुंबईत मार्चपासून इलेक्ट्रॉनिक शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाले. त्यात रुग्णालयातील हेल्थकेअर वर्कर्सना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ही प्रक्रिया आणखी बिकट झाली. रुग्णांमधील भीती जावी यासाठी नॉन कोव्हिड रुग्णांसाठी वेगळे प्रवेशद्वार आणि वेगळे कर्मचारी ठेवले. तसेच, खासगी रुग्णालयांमध्ये नॉन कोव्हिड रुग्णांसाठी 50 टक्के राखीव बेड्स ठेवले आहेत. मात्र, त्याचाही फायदा झाला नाही. तसेच, उपचाराला उशिर होत असल्यामुळे रुग्णांचीही प्रकृती बिकट होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सायन रुग्णालयात पुर्वी रोज 80 ते 100 मोठ्या आणि छोट्या शस्त्रक्रिया होत असे. एका आठवड्यापूर्वीच रुग्णालयातील रूटीन काम सुरु झाले आहे. त्यामुळे, आता किमान 30 शस्त्रक्रिया रोज होत आहेत. शिवाय, आता कोरोना रुग्ण थेट कोव्हिड सेंटरमध्ये पाठवले जातात. त्यामुळे, रुग्णांमधील भीती कमी होऊन शस्त्रक्रियांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
- डॉ. रमेश भारमल,
अधिष्ठाता, सायन रुग्णालय
---------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.