company 
मुंबई

कोरोनापेक्षा कारखाना बंद होण्याची भीती, 'या' विभागातील 21 कंपन्यांना नोटीसा

सकाळवृत्तसेवा

ठाणे : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर उद्योगचक्र सुरु झाले असून कंपन्यांनीही उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे संकट डोक्यावर असताना डोंबिवलीतील 21 कंपन्यांना मात्र दुसरीच चिंता सतावत आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालय कल्याण व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी डोंबिवली औद्योगिक विभागातील 21 रासायनिक कंपन्यांना बंदची नोटीस बजावली आहे. कंपन्यांमधील त्रूटी दूर केल्यानंतरही कंपन्या बंद करण्याची नोटीस दिल्यामुळे कारखानदार चिंतेत आहेत. 

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणाबाबतचा आढावा मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. कंपन्यांनी सुरक्षा उपकरणे लावावीत, अन्यथा कंपन्यांना टाळे ठोका, असा सज्जड इशारा त्यांना या वेळी दिला होता. त्यानंतर उद्योजकांनी कंपन्यांमधील त्रुटी दूर करत तसा अहवालही दिला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत, काही कंपन्यांना व्यवहार सुरु करण्याची परवानगी देण्यात आली, असली तरीही कोरोनाचे संकट, कामगारांची कमतरता या संकटासोबतच कंपन्यांना सध्या या बंदच्या नोटीसीचीही चिंता सतावत आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने यांनी सुमारे 21 कारखान्यांना बंदाची नोटीस बजावली आहे. कंपन्यातील त्रुटी दूर करेपर्यंत कंपन्या बंदची नोटीस देण्यात आली आहे. यातील अनेक कंपन्यांनी त्रूटी दूर केल्याचा अहवाल दिला आहे, तरीही कंपनी सुरु करण्याची परवानगी मिळत नसल्याचे उद्योजकांनी सांगितले. कल्याण शीळ रोडवरील कंपनी 50 वर्षे जुनी असून मध्यंतरी या कंपनीला आग लागली होती. तेव्हापासून कंपनीतील त्रूटींविषयीच्या  त्यांना नोटीसा बजावण्यात येत असून आता कंपनी कायमची बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच इतर छोट्या कंपन्यांनाही त्रूटी दूर केल्यानंतरही कंपनी सुरु करण्याची परवानगी अद्याप देण्यात आली नसल्याचे उद्योजकांचे म्हणने आहे. 

कंपन्या अन्यत्र हलवण्याची तयारी
अधिकारपदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही उद्योजक करत आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून काही उद्योजकांनी डोंबिवलीतून कंपनी अन्यत्र हलविण्याची तयारी करीत आहेत. दरम्यान रासायनिक कंपन्या कायमच्या बंद व्हाव्यात, अशी कोणतीही भूमिका नाही. काही कंपन्यांना बंदची नोटीस व काही कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असून त्रूटी दूर केल्यावर त्या पुन्हा सुरु करण्यात येतील, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

Fear of factory closure over corona, ban notice to 21 companies 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KBC Contestant Arrest : 'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक धक्कादायक कारण आले समोर

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

Hardik Pandya ची मन जिंकणारी कृती; मुंबईच्या ग्राऊंड्समन्सना केली आर्थिक मदत... कारण ऐकून वाढेल आदर...

Gold Rate Today: युद्धाचा आणि डॉलरचा सोन्यावर डबल इफेक्ट! मार्चमध्ये सोनं 30 हजारांनी स्वस्त; महाराष्ट्रात आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT