मुंबई

म्हणे पैशाचा पाऊस पडणार; शिवडीत स्टार प्रकारातील कासवाची तस्करी

अनिश पाटील

मुंबई - आजच्या आधुनिक युगातही अनेकजण अंधश्रद्धेच्या गाळात रुतलेले असल्याचे वास्तव मुंबईच्या शिवडीत स्टार प्रकारातील कासवाच्या तस्कराच्या माध्यमातून समोर आले आहे. पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून कासवाची ही तस्करी होत असल्याची गंभीर बाबही या निमित्ताने समोर आली आहे. अंगावर चांदणीसारखे रेखाटण असलेली पाच कासवे पोलिसांनी आरोपीकडून ताब्यात घेतली आहेत.

शिवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक किरण मांडरे, हवालदार आवकिरकर, पोलीस शिपाई देठे, पोलिस शिपाई मोरे, पोलीस शिपाई  मेटकरी,पोलीस शिपाई  महाडिक हे गस्त करित असताना. नाकाबंदी दरम्यान आरोपी मोहम्मद यासीन रमजान अली मोमीन (24), अजगर अली लियाकत अली शेख (32) या दोघांजवळ एका पिशवीत ५ स्टार कासव आढळून आले. पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्या दोघांनी ही दुर्मिळ कासवं ही हैद्राबादहून तस्करीसाठी आणली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

या माहितीच्या आधारावर शिवडी पोलिसांनी आरोपींवर कलम 9,39,39(ड),48,49,50 व 51 वन्यजीव सरक्षण अधिनियम 1972 अन्व्ये गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. या कासवांची बाजारात किंमत ही दीड लाख रुपये इतकी आहे. या तस्करीमागे दुर्मिळ वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या इंटरनॅशनल टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुशंगाने तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

fencing of star type turtles in Shivdi in mumbai

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT