मुंबई

लढा कोरोनाशी : लॉकडाऊनमुळे उपाशी राहण्याची वेळ आलेल्या नागरिकांना असं मिळतंय जेवण

सकाळवृत्तसेवा

मुंबई - संपूर्ण जगांत कोरोनाची थैमान घातले असून, याला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक कामगार-निर्वासितावर खाण्या-पिण्याची वेळ आली आल्यानंतर त्यांच्या मदतीला अनेक माजी पोलीस अधिकारी धाऊन आले आहेत. 

जे कामगार अथवा निर्वासित आहेत, त्यांच्या दोन वेळ जेवणाची सोय या माजी अधिकाऱ्यांनी केली आहे. यामध्ये माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांची रोटी बँक ही स्वयंसेवी संस्था अग्रेसर आहे. तसेच माजी पोलीस महासंचालक अनामी रॉय यांच्या वंदना फाउंडेशनने देखील जेवण उपलब्ध केले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्गाने थैमान घातले असून, आत्ता पर्यंत 157 रुग्ण सापडले आहेत. तर उत्तरोत्तर ही संख्या वाढत चालली आहे. यामुळे संपूर्ण देशांत लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक कामगार तसेच रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या निर्वासितांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

अशावेळी माजी पोलीस महासंचालक राहिलेले डी शिवानंदन यांनी त्यांच्या रोटी बँक या संस्थेच्या माध्यमातून या नागरिकांना जेवण देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. यासाठी शिवानंदन यांनी त्यांच्या मोठ्या स्वयंपाक घरात जवळपास हजार हुन अधिक जणांचे जेवण बनविण्यास सुरुवात केली आहे. 

गुरुवारी त्यांनी 1 हजार कामगार तसेच निर्वासितांना जेवण दिले होते. तर शुक्रवारी 2 हजार जणांना त्यांनी जेवण वाटप केले होते. शनिवारी त्यांनी 4 हजार जणांना जेवण वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना स्थानिक पोलीस देखील मदत करीत आहेत. कुर्ला, धारावी घाटकोपर, सायन या ठिकाणी त्यांनी जेवण वाटप सुरू केले आहे. 
 तर माजी पोलीस महासंचालक  अनामी रॉय यांच्या वंदना फाऊंडेशनने देखिल अशा प्रकारे कार्यक्रम हाती घेतला आहे. 

fight against covid19 ex police officers providing food for needy people in crisis period of corona 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT