मुंबई

'एमए' च्या अंतिम सत्राचा निकाल रखडला; परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान?

तेजस वाघमारे


मुंबई  : मुंबई विद्यापीठामार्फत ऑक्टोबर महिन्यात घेलेल्या एम ए पाँलिटीक्स अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. निकाल रखडल्याने परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे.

मुंबई विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात एमए पाँलिटीक्स अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राची परीक्षा घेतली. ही परीक्षा सुमारे 80 विद्यार्थ्यांनी दिली होती. विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्यानंतर किमान 45 दिवसांत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालेला नाही. ही परीक्षा दिलेले बहुतांक्ष विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठात अर्ज करतात. मात्र या परीक्षेचा निकालच त्यांच्या हाती नसल्याने त्यांचे प्रवेश बोंबलले आहेत.

एमए पाँलिटीक्स विभागाकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा डाटा परीक्षा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. माञ परीक्षा विभागाकडून अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. निकाल लावण्याचे काम सुरू असून लवकरात लवकर तो जाहीर केला जाईल, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली.

The final session of MA was delayed  

-------------------------------------------

संपादन  - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT