mumbai  sakal
मुंबई

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात गुन्हा

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह आठ जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह एकंदर आठजणांवर काशी मिरा भागातील जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी काशी मिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नरेंद्र मेहता यांनी राजकीय दबावापोटी ही खोटी तक्रार करण्यात आली असल्याचा खुलासा केला आहे. रियल इस्टेटचा व्यवसाय करणारे जय शुक्ला यांनी याप्रकरणी काशी मिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार काशी मिरा भागातील एका जमिनीवर बांधण्यात येणार्‍या संकुलातील सदनिका आणि गाळे यांची विक्री करण्यासंदर्भात विकासक हातीम मियाजीवाला आणि इतर यांनी जय शुक्ला यांची सोल सेलिंग एजंट म्हणून नियुक्ती केली होती. (Mumbai News)

बदल्यात शुक्ला यांनी या प्रकल्पासाठी 2 कोटी 49 लाख रुपये देखील मियाजीवाला यांना दिले होते. परंतू करारात नमूद कालावधीत हे संकुल पूर्ण करण्यात न आल्याने शुक्ला यांनी याबाबत मियाजीवाला यांच्याकडे विचारणा करुन पैसे परत मागितले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या कार्यालयात बोलावून शुक्ला यांना सेटलमेंट कर अन्यथा आहेत तेदेखील मिळणार नाही असे सांगितले.

यावेळी मेहता यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही उल्लेख केला असल्याचे तक्रादारचे म्हणणे आहे. त्यानंतर काही दिवसांनी ही जागा नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीतील संजय सूर्वे यांना विकण्यात आली असल्याचे समजले. त्यामुळे शुक्ला यांनी नरेंद्र मेहता यांच्यासह आठजणांनी फसवणूक केली असल्याची तक्रार काशी मिरा पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधला असता शुक्ला यांनी पूर्णपणे खोटी तक्रार केली आहे. शुक्ला हेच माझ्याकडे दहा महिन्यांपूर्वी मदत मागण्यासाठी आले होते. शुक्ला यांच्याशी कोणत्याही प्रकारचा व्यवहारच केला नसल्याने त्यांची पसवणूक करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे केवळ राजकीय दबावातून ही तक्रार करण्यात आली असल्याचा खुलासा मेहता यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

Tribal Students Protest : चर्चा फिस्कटल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा; नव्याने दोन अत्यवस्थ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Marathi News Live Updates : तरुण तेजपाल यांना तीन आठवड्यांच्या आत शरणागती पत्करण्याचे आणि शरणागतीचे प्रमाणपत्र न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश

Jalkot Water Supply : जळकोटचा पाणीप्रश्न सुटणार; ६२ कोटींच्या नवीन जलवाहिनी व नळयोजनेला नगरपंचायतीची मंजुरी

SCROLL FOR NEXT