'Veena Santoor' building caught fire Esakal
मुंबई

Video: कांदिवलीतील 'वीणा संतूर' इमारतीला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू

आग सध्या नियंत्रणात आली असून फायर कुलिंगचं काम सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मुंबईतील कांदिवली इथल्या वीणा संतूर इमारतीला दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत दोन जणांना होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी युद्धपातळीवर आग नियंत्रणात आणली.

सध्या फायरकुलिंगचं काम इथं सुरु आहे. पण ही आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. (Fire broke out in Pavan Dham Veena Santur Building of Mahaveer Nagar in Kandivali West Mumbai)

दोन मजल्यांना आग

सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर येथील वीणा संतूर इमारतीला दुपारी १२.२७ वाजता ही आग लागली. सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीच्या बाजूला असलेल्या या इमारतीच्या ग्राऊंड आणि पहिला मजला अशा दोन मजल्यांवर ही आग भडकली. (Latest Marathi News)

दोन जणांचा होरपळून मृत्यू

सुरुवातीला या आगीत एक वृद्ध महिला आणि एक लहान मुलासह तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. पण आता यात इतर दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती एबीपी माझानं दिली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोरेगाव इथं देखील अशाच प्रकारे एका रहिवासी इमारतीत लागलेल्या आगीत अनेकांचा होरपळून मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Mhatre: हवं तर तडीपार करा, पण जेलमधून बाहेर सोडा; जामिनासाठी शिंदेंच्या नेत्याची हायकोर्टात गयावया

India Probable Playing XI vs Sri Lanka: ७ फलंदाज, २ अष्टपैलू, ६ गोलंदाज... पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा कुणाला? जाणून घ्या भारताचे तगडे ११ खेळाडू

Latest Live Updates Marathi : : लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

IND vs ZIM: "धन्यवाद लक्ष्मण सर!" ३-० विजयानंतर श्रेयस अय्यर भावूक; ड्रेसिंग रूममधील Video Viral

आम्हाला गॅरंटी दिलीय, सरकारने आणखी एक मागणी मान्य केली; मध्यरात्री CJP प्रवक्त्याने दिली माहिती

SCROLL FOR NEXT