मुंबई

भिवंडीतल्या यंत्रमाग कारखान्याला भीषण आग, सुदैवानं जीवितहानी टळली

पूजा विचारे

मुंबईः  भिवंडीतल्या खोका कंपाऊंड परिसरात एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे आग पसरत गेल्याचं समजतंय. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ते आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 

भिवंडीतल्या खोका कंपाऊंड परिसरात यंत्रमाग कारखाना आहे. आज सकाळी या कारखान्यात आग लागली. या कारखान्यात कापड जास्त प्रमाणात असल्यानं आगीनं रौद्ररुपधारण केलं. 

आग लागलेल्या कारखान्याच्या परिसरात रहिवासी परिसर असल्यानं एकच खळबळ उडाली. आग लागल्याचं समजताच स्थानिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळावर दाखल झाल्या. 

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान कारखान्यात आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच सुदैवानं या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. 

Fire broke out at spinning mill in Bhiwandi but fortunately no casualties were reported

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT