fire 
मुंबई

आता मुंबईत शॉपिंगही धोकादायक? जळालेल्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह.. 

समीर सुर्वे

मुंबई: बोरीवली येथील आगीत खाक झालेल्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमुळे मुंबईतील शॉपिंग धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.या शॉपिंग सेंटर मधिल अंतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणा काम करत नसल्याची शक्यता असून त्याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

तब्बल 12 तासांनी ही आग विझली आहे. तर जिवीत हानी झालेली नसली तरी अग्निशमन दलाचे दोन अधिकारी गुदमरल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या बेसमेट मध्ये आज पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास आगी लागण्यास सुरुवात झाली.बेसमेंट मधिल इलेक्टॉनिक्सचेे साहित्य, कपडे तसेच इतर जळावू साहित्यामुळे ही आग वेगाने पसरु लागली. त्यातच बेसमेंट मधून धुर बाहेेेर जाण्यास जागा नसल्याने आगीवर नियंत्रण मिळण्यात अडचणी होत्या.

त्यातच दुकानांमधिल जळावू साहित्याने आग वेगाने पसरत होती. दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्या पर्यंत आग पोहचली. आग   अटोक्यात आणण्यासाठी 14 बंब, 13 पाण्याचे टॅंकर तैनात करण्यात आले होते. तसेच फायर रोबोटही वापरण्यात आला. दुपारी 2 वाजून 45 मिनीटांनी ही आग विझली अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळे यांनी दिली.

आगीचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट नाही: 

धुरामुळे आगीवर नियंत्रण आणण्यात अडचणी येत होत्या.त्यामुळे या इमारतीतील अंतर्गत अग्निप्रतिबंधक यंत्रणा काम करत होती का नाही यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे एका अधिकार्याने सांगितले.मुंबईतील शॉपिंग सेंटर मॉल एवढेच काय अनेक रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा नियमावलीचे उल्लंघन केलेले आता पर्यंत आढळले आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

fire extinguisher failed in indraprasth shopping centre in mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT