Fire News uttan sakal
Fire News uttan sakal sakal
मुंबई

Fire News: उत्तनमध्ये मासेमारी नौकेला आग; लाखो रुपयांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Fire News: उत्तन येथील पातान बंदर येथे समुद्रकिनार्‍याजवळ नांगरुन ठेवण्यात आलेल्या मासेमारी नौकेला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण नौका जळून खाक झाली असून मच्छिमाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले

पातान बंदर येथे समुद्रात नांगरुन ठेवण्यात आलेल्या सिरील घावट्या यांच्या राजश्री नावाच्या मासेमारी नौकेला शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास अचानक आग लागली. याची माहिती मिळताच आसपासच्या मच्छिमारांनी तातडीने धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. मिरा भाईंदर महनागरपालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीत मासेमारी जाळी, नौकेच्या तांडेलची केबीन, मासळी साठविण्याचे नौकेतील शीतगृह, खलाश्यांची रहाण्याची जागा, जीपीएस व वायरलेस यंत्रणा त्याचप्रमाणे अन्नधान्य असे मिळून एकंदर तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. नौकेची दुरुस्ती करण्यासाठी मोठा खर्च येणार असून त्याला बराच अवधी देखील लागणार आहे. या काळात मासेमारी पूर्णपणे ठप्प होणार आहे.

मासेमारी व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी सिरील घावट्या यांनी केली आहे. मासेमारी नौकांचे वेगवेगळ्या अपघातात मोठे नुकसान होत असते. परंतू राज्य सरकारकडून मच्छिमारांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही.

दुष्काळात शेतकर्‍यांना ज्याप्रमाणे मदत केली जाते त्याच प्रमाणे केवळ मासेमारी व्यवसायावरच अवलंबून असलेल्या मच्छिमारांनाही राज्य सरकरने आर्थिक मदत करणे आवश्यक आहे अशी मागणी माजी स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी त्याचप्रमाणे मच्छिमारांचे नेते बर्नड डिमेलो यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT