संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये फायर लाईन आखण्यात आल्या.  esakal
मुंबई

Forest Fire in Mumbai : जंगलातल्या वणव्यावर तात्काळ नियंत्रण मिळवणे झाले शक्य

Sanjay Gandhi National Park : येऊरमधील जंगलात ठिकठिकाणी फायर लाईन : वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के

सकाळ वृत्तसेवा

Forest Conservation in Thane : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही देशाची वनसंपत्ती आहे. या उद्यानात अनेक प्रकारचे झाडे, पशू, पक्षी वास्तव्य करतात. मात्र, मानवाकडून लावल्या जाणाऱ्या वणव्यासारख्या संकटाने येथील वनसृष्टी धोक्यात येते. हा धोका टळावा, त्यापासून जंगलाचे रक्षण व्हावे, यासाठी वनविभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येऊर रेंजमध्ये वन विभागाने (yeoor range forest) शास्त्रीय पद्धतीने जळीत रेषा (fire lines) आखल्याने आगीवर नियंत्रण आले आहे.

ठाणे आणि मुंबईत पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वनविभागाने काळजी घेतली आहे. त्यामुळे यंदा कडक उन्हाळा असतानाही वणवे नियंत्रणात आल्याचे दिसते. उन्हात झाडांच्या घर्षणाने काही वेळा नैसर्गिक आग लागते; मात्र अशी नैसर्गिक आग लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

बांबूच्या वनात अशा प्रकारच्या आगी लागण्याचे प्रमाण जास्त असते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बाबूंचे प्रमाण अत्यल्प आहे. इतर झाडे जास्त आहेत. त्यात सारदोल, असाना, काटेसावर, शेमट आदी दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या देशी प्रजातीच्या झाडांचाही समावेश आहे.

साग, शिसव, बार्तोंडी, पळस, आंबा, जांभूळ, वड, पिंपळ अशी जंगलाला पोषक झाडे आहेत. त्या सगळ्यांचे जतन आणि वाढ होणे आवश्यक आहे. म्हणूनच ही वनसंपत्ती जपण्यासाठी काळजी घेणे गरजेचे असल्याने त्यांचे संकटांपासून संरक्षण करत आहोत, असे वन अधिकाऱ्याने सांगितले.

जंगलातील आगीवर नियंत्रण करण्यासाठी जळीत रेषा जंगलाचे सुरक्षा (fire line) कवच असते. एका वनाच्या पट्ट्यात लागलेली आग दुसरीकडे पसरणार नाही, यासाठी डिसेंबर ते जानेवारीत जंगलामध्ये साधारण सहा मीटर अणि बारा मीटर रुंद अशा पद्धतीने जागेतील वाढलेली झुडपे, गवत काढले जाते.

जंगलातील महत्त्वाच्या जागेत शेकडो किलोमीटर लांब अशा पद्धतीने काम केले जाते. एखाद वेळेस जंगलात आग लागलीच तर या रेषेमुळे वणवा मर्यादित राहतो.

उन्हाळ्यात आगीच्या घटना रोखण्यासाठी येऊरमधील जंगलात ठिकठिकाणी फायर लाईन आखण्यात आल्या आहेत. कर्मचारी, अधिकाऱ्यांमार्फत वणवा लागू नये याकरिता दिवस रात्र गस्त घालण्यात येते. तसेच येथील आदिवासी पाड्यांमध्ये जनजागृती केली जाते, असे येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT