मुंबई

मध्य रेल्वेवर धावली पहिली एसी लोकल 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बऱ्याच काळाच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज मध्य रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल धावली. या पहिल्या वातानुकूलित लोकलला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 

सध्या पश्‍चिम आणि मध्य रेल्वेवर प्रत्येकी एक एसी लोकल धावते. भविष्यात एसी लोकलची संख्या वाढवावी, आशी मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली. अर्थसंकल्पात उपनगरी रेल्वेचे तिकीट दर वाढवू नयेत, असेही माते म्हणाले. यावेळी खासदार मनोज कोटक, राज्यमंत्री अदिती तटकरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल आदी उपस्थित होते. 

या सुविधांचे झाले उद्‌घाटन 

  •  12 रेल्वे स्थानकांवरील 13 पादचारी पूल 
  • घाटकोपर, कामण रोड स्थानकात तिकीट घर 
  • एलटीटी, पनवेल स्थानकात डिलक्‍स शौचालय 
  • चुनाभट्टी, कोपर स्थानकात फलाटांचे नुतनीकरण 
  • भायखळा, दादर स्थानकात एचव्हीएलएस पंखे 
  • सीएसएमटी स्थानकात सोलर पॅनल 
  • 20 रेल्वे स्थानकांत मोफत वायफाय 
  • दादर, ठाणे स्थानकात आधुनिक इंडिकेटर 


एसी लोकलसाठी... 

  •  देखभाल दुरुस्तीसाठी 100 कर्मचारी 
  • प्रत्येक डब्यात 15 टनचे दोन एसी 
  • सहा सेकंदात उघड-बंद होणारे स्वयंचलित दरवाजे 
  • एका डब्यात चार "टॉकबॅक' यंत्रणा 
  • चार स्क्रीनवर कळणार पुढील स्थानक  

web title : First AC local ran on Central Railway

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT