doctor
doctor 
मुंबई

मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवा धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील आरोग्य व्यवस्थेवरील ताण दिवसेंदिवस वाढत असून शहरी भागात 64 हजार लोकांसाठी केवळ एक सार्वजनिक दवाखाना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इतकंच नाही तर पालिकेच्या दवाखान्यांमध्ये 19 टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या वार्षिक अहवालात समोर आल्याने मुंबईतील आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रजा फाउंडेशन प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार शहरी भागात 40,598 लोकांसाठी एक, तर पश्चिम उपनगर 86,360 आणि पूर्व उपनगरात 72,263 लोकांसाठी एक सार्वजनिक दवाखाना असल्याचे स्पष्ट झाले आहे.पालिकेच्या एका दवाखान्यात सरासरी केवळ एकच कर्मचारी नियुक्त असून पालिकेच्या दवाखान्यात 19 टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.मुंबईतील अधिकतर लोकं सरकारी आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून असून 76 टक्के लोकं हे सरकारी रुग्णालयात उपचार घेतात.तर 73 टक्के लोकांना सरकारी आरोग्य विमा योजनेची कल्पना नसल्याचे ही समोर आले आहे.

मुंबईतील लोकांचा आपल्या आरोग्यावर मोठा खर्च होत असून प्रत्येक व्यक्तीचा वर्षाला वैद्यकीय सेवांवर आपल्या उत्पन्नातील 9.7 टक्के म्हणजेच घरटी सरासरी 98,214 रुपये खर्च होत आहेत. पालिका आरोग्य व्यवस्थेवर हजारो कोटी रुपये खर्च करत असून 2019 रोजी पालिकेने आरोग्य सेवेवर 27,795 कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पालिका आपल्या आरोग्य महसुलातील 74 टक्के खर्च रुग्णालयांवर तर 26 टक्के खर्च दवाखान्यावर करते.तरीदेखील उत्तम आरोग्य सेवा देण्यात पालिका अपयशी ठरली आहे.यात सुधार करावयाचा असल्यास पालिकेचे दवाखाण्यांचा वेळ वाढवून ती 8 ते 10 अशी करावी, त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवावी तसेच सरकारने अर्थसंकल्पातील तरतुदी आणि दवाखान्यांवर होणारे खर्च वाढवले पाहिजेत असे प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.

टीबी आणि मधुमेहाचा वाढता धोका

मुंबईत वेगवेगळ्या आजारांचा फैलाव होत असून टीबी आणि मधुमेहा चं प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहरे.मुंबईत सर्वाधिक मृत्यू हे टीबी आणि मधुमेह या आजारामुळे होत असून टीबीने दररोज 15 तर मधूमेहाने दररोज 26 रुग्णांचा मृत्यू होत आहे.2017 मध्ये टीबीने 5,449 तर मधुमेहाने 9,525 जणांचा मृत्यू झाला आहे.तर मुंबईत सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यात नोंद झालेल्या संवेदनशील आजारांत एल प्रभागात 2018 मध्ये 11,505 अतिसार,786 क्षयरोग आणि 1,831 मधुमेह च्या केसेस ची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : मताधिक्य राखण्याचे दिग्गजांपुढे आव्हान ; दहापैकी सात जागांवर मिळाला होता लाखो मतांनी विजय

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशचा 'बुलडोझर पॅटर्न' सांगलीत.. योगी आदित्यनाथ यांच्या स्वागताला आणले जेसीबी

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT