मुंबई

1 एप्रिलपासून विजेचे नवीन दर लागू होणार; घरगुती ग्राहकांसाठी 'असे' असतील वीजदर

तेजस वाघमारे

मुंबई, ता. 4 : राज्य वीज नियामक आयोगाने राज्यातील वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांसाठी वीजदरात सरासरी 2 टक्क्यांची कपात केली आहे. मात्र टाटा पॉवर वीज वितरण कंपनीच्या विजेच्या दरात वाढ होणार आहे. 1 एप्रिलपासून  राज्यात नवीन वीजदर लागू होणार आहेत. 

राज्य वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील वीज ग्राहकांचे वीजदर जाहीर केले आहेत. 2020 - 21 ते 2024 - 25 या कालावधीत वीजदर आकारणीबाबतचा आदेश आयोगाने जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्याने ग्राहकांकडून वीजबिलात सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आयोगाने महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांना 1 एप्रिल 2021 पासून वीजबिलात सरासरी 1 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना वीज वापरासाठी आता प्रत्येक युनिटमागे 7.58 रूपये मोजावे लागतील.

अदानी कंपनीच्या वीज ग्राहकांसाठी 0.3 टक्के इतकी वाढ लागू होणार आहे. त्यामुळे अदाणीच्या ग्राहकांना प्रत्येक युनिटसाठी 6.53 रूपये मोजावे लागणार आहेत.

बेस्टच्या वीज ग्राहकांसाठी 0.1 टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या वीज ग्राहकांना युनिटमागे 6.42 रूपये मोजावे लागतील.

टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी यंदाच्या 1 एप्रिलपासून वीज दरवाढी जाहीर झाली आहे. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना आता युनिटमागे 5.22 रूपये मोजावे लागतील. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांसाठी 4.3 टक्के दरवाढ आयोगाने मंजुर केली आहे.

कंपनी 21-22 22-23  23-24 24-25 दरवाढ / कपात
महावितरण 7.58 7.52 7.43 7.40 1 टक्के (कपात)
अदानी  6.53 6.56 6.51 6.51 0.3 (वाढ)
बेस्ट 6.42 6.44 6.47 6.49 0.1 टक्के (वाढ)
टाटा 5.22 5.25 5.28  5.36  4.3 टक्के (वाढ)

from first april new electricity tariffs will be implemented in maharashtra check tariff cards

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT