मुंबई

मासळीचे दर दुपट्टीने वाढल्याने खवय्यांचा हिरमोड; मोजावे लागतात अधिक पैसे

प्रमोद जाधव

अलिबाग - अवकाळी पाऊस, बदलते हवामान, डिझेलचे वाढते दर, समुद्रातील मासळीचा तुटवडा अशा कारणामुळे रायगड जिल्हयात मासळीचा दुष्काळ जाणवू लागला आहे. त्यामुळे मासळीचे दर दुपट्टीने वाढले असल्याचे मच्छीमार संघटनेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून आले आहे. 150 ते 900 रुपये किलोने मिळणाऱ्या मासळीसाठी 300 ते एक हजार 200 रुपये मासळी खवय्यांना मोजावे लागत आहेत. 

रायगड जिल्हयामध्ये सुमारे पाच हजार मासेमारीसाठी बोटी आहेत. त्यामध्ये दोन हजार 227 बोटी यांत्रिकी बोटी आहेत. मासेमारी व्यवसायावर सुमारे चार लाख नागरिक अवलंबून आहेत. या व्यवसायातून त्यांना रोजगार प्राप्त होतो. परंतू डिझेलचे दर भरमसाठ वाढल्याने डिझेल, बर्फ तसेच खलाशांचा खर्च न परवडण्यासारखा झाला आहे. त्यात बदलत्या हवामानामुळे समुद्रात मासे मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना रिकाम्या हातीच परतण्याची वेळ आली आहे. समुद्रात मासळीचा तुटवडा जाणवत असल्याने गेल्या 40 दिवसापासून  थळ, नवगाव, वरसोली, चाळमळा, अलिबाग आदी बंदरावर बोटी उभ्या आहेत. त्याचा फटका मासेमारी व्यवसायावर झाला आहे. मासळीचा ओघ कमी झाला आहे . त्यामुळे मासळीचे दर दुपट्टीने वाढले आहेत. मासळीचे दर वाढल्याने मासळी खवय्यांना लहान मासळी विकत घेऊन दुधाची ताण ताकावर अशी परिस्थिती निर्माण झाले आहे. 

मासळीवर दृष्टीक्षेप 
 

मासळी मागील दर

आताचे दर (किलोनुसार)

बांगडा 150- 250 300
सुरमई 400 600
लहान आकाराचे पापलेट 300-400 500 
मोठ्या आकाराचे पापलेट 900 1200
लहान आकाराची कोलंबी 100 200
मध्यम आकाराची कोळंबी 200 300
 मोठ्या आकाराची  सफेद कोळंबी 500 600

समुद्रात मासळी मिळत नसल्याने मासेमारीसाठी असणारा खर्च परवडत नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट मच्छीमारांवर आले आहे. मासळीची कमतरता जाणवत असल्याने मासळीचे दर वाढले असून शासनाने मासळीचा दुष्काळ जाहीर करावा. 
 शेषनाथ कोळी -
अध्यक्ष 
रायगड जिल्हा मच्छीमार संघटना

Fish prices doubled Fish consumer have to pay more in raigad

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette Price: सिगारेट ओढणाऱ्यांना मोठा झटका! १८ रुपयांची सिगारेट थेट ७२ रुपयांवर पोहोचणार? नेटकरी म्हणाले- आता सर्व...

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० ची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

नोरा फतेही पुन्हा प्रेमात? फुटबॉलपटूला डेटिंग करत असल्याची अफवा, दुबई आणि मोरोक्कोमध्ये गाठीभेटी सुरु

PCMC Election : पिंपरीतील तीन जागांवर युती काढणार तोडगा; नेत्यांकडून बैठकांचा सपाटा

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

SCROLL FOR NEXT