मुंबई

...म्हणून आता ताजा म्हावरा मिळणार नाय

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : यंदा चक्रीवादळे, अवकाळी पाऊस अशा संकटांमुळे मच्छीमार मेटाकुटीला आले. त्यात आता कोरोनाचे संकट आले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी बंदरातून बोटी किनाऱ्यावर खेचत शाकारण्यास सुरुवात केली आहे. पावसाळा सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी असतानाही त्यांनी नुकसान सोसत हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मांसाहरप्रेमींना काही महिने ताजा म्हावऱ्याची चव चाखता येणार नाही. जिल्ह्यात तब्बल 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक मोठी उलाढाल या व्यवसायातून होते. 

हे वा़चा : एसटीचे कामगार धोक्यात

दर वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला नौका बंदरातून बाहेर काढल्या जातात; परंतु शिल्लक राहिलेल्या दिवसात स्थिती सुधारेल अशी कोणतीच लक्षणे नसल्याने मच्छीमारांनी हताश होत नौका पावसाळ्यासाठी शाकारून ठेवण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे मासेमारीचा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. मासळी विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी ग्राहकांअभावी बहुतांश बांधवाचा खिसा रिकामाच राहिला आहे. त्यात महाराष्ट्र सरकारकडून 140 कोटी रुपयांचा डिझेल परतावा मंजूर होऊनही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत काही मिळकत नसल्याने नव्या हंगामात मासेमारी करायची तरी कशी? व आताचे हे आगोटीचे दिवस घालवायचे कसे, या विवंचनेत मच्छीमार आहेत. या सर्व परिस्थितीत कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार हा आर्थिक संकटात सापडला आहे. म

च्छीमार कोळी बांधव व मच्छीमारीवर आधारित असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिक यांची फार दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. अनेक वेळा समुद्री छोटे-मोठे वादळे आले. त्यामुळे मच्छीमारांचे कंबरडे मोडलेले आहे. नेहमीच गजबजलेला मच्छीमारांचे बंदरावर तर सर्वत्र शुकशुकाट पसरलेला दिसत आहे. ही स्थिती सुधारेल अशी कोणतीही लक्षणे नसल्याने मच्छीमारांनी हताश होत मोरा, वरसोली, आक्षी, रेवदंडा, दिघी, कुडगाव, आदगाव, भरटखोल, दिवेआगर, जीवना बंदर, मूळगाव, दांडा विभाग, बागमांडला इत्यादी ठिकाणच्या मच्छीमारांनी आपापल्या नौका किनाऱ्यावर ओढण्यास सुरुवात केली आहे. 

हे वा़चा : फ्लेमिंगोंची संख्या वा़ढली

कोकणातील मच्छीमारी हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. यावर आमचे व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालत असतो. गतवर्षीचे चक्रीवादळे व आताचे कोरोनाचा संकट यामुळे आज उपासमारीची वेळ आली आहे. आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नाही. शासनाने आमच्या मच्छीमारांनाचा गांभीर्याने विचार करावा आणि आर्थिक सहाय्य निधी द्यावा, अशी मच्छीमारांची मागणी आहे. 
- हरिओम चोगले, 
भरटखोल मच्छीमार नेते 

कोकणातील मच्छीमार हा उद्‌वस्त झाला आहे. दैनंदिन होत असलेला नौकांचा खर्च, खलाशी वर्गाचा पगार व थकलेले बॅंक हप्ते यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने शेतकरी बांधवांप्रमाणे मच्छीमारांना आर्थिक मदत करावी. 
- चंद्रकांत वाघे, 
श्रीकृष्ण मच्छीमारी संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन 

कधी पाहिले नव्हते येवढी अतिशय दयनीय अवस्था मच्छीमारांची निर्माण झाली आहे. नवीन हंगाम सुरू करण्याच्या मनस्थितीत कुठलाही मच्छीमार दिसत नाही. शिल्लक डिझेल परतावा आणि डागडुजीसाठी उपलब्ध भांडवल यामुळे यंदा ही परिस्थिती ओढवली असल्याचे कळते आहे. शासनाने मच्छीमारांनाच्या पाठीशी खंबीरपणेउभे राहावे अशी अपेक्षा मच्छीमारांकडून व्यक्त केले जात आहे. 
- एकनाथ वाघे, 
मच्छीमारी बुजुर्ग नेते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT