eknath shinde
eknath shinde  sakal
मुंबई

Ayodhya Ram Mandir : पाचशे वर्षाचे स्वप्न आणि प्रतीक्षा संपली ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राहुल क्षीरसागर

ठाणे : आयोध्या आणि राममंदिर आमच्याकरिता राजकीय विषय नाही. हा आमच्याकरिता अस्मिता श्रद्धा आणि भक्तीचा विषय आहे. पाचशे वर्षाचे स्वप्न आणि प्रतीक्षा संपली आहे. हा ऐतिहासिक दिवस असून तो सोनेरी अक्षरात लिहिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. योध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात आपल्या सहकाऱ्यांसह "जय श्रीराम" चा जयघोष केला. स्वतः ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला. आयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर कोपीनेश्वर मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतीत महाआरती करण्यात आली. तसेच यावेळी १११ फूट लांबीची अगरबत्ती प्रजवल्लीत करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

करोडो रामभक्तांची जी इच्छा आज पूर्ण झाली असून हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र आणि आयोध्येचे जुने नाते आहे. श्रीराम हे वनवासात असताना त्यांचे नाशिकच्या पंचवटीत वास्तव होते असे देखील शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच श्रीरामाच्या मंदिर उभारण्याकरिता जे सागाचे लाकूड वापरण्यात आले, ते महाराष्ट्रतील चंद्रपूर येथून पाठ्वविण्यात आले, हि आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आम्ही जेव्हा आयोध्येत जातो तेव्हा तिथे आम्हाला श्रीरामाचे अस्तित्व जाणवते. त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी गर्वाचा आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे.

दरम्यान, यावेळी शिवसेना उपनेते  प्रकाश पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांदीची गदा देण्यात आली. ती गदा मुख्यमंत्र्यांनी मंदिराच्या ट्रस्टीना देऊन रामाच्या मंदिरात ठेवण्यासाठी सांगितले. यावेळी प्रकाश पाटील यांनी कोपीनेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी पाच लाखाचा धनादेश ट्रस्टीना दिला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते.

चारकोल, जिगट, बांबू, चंदन पावडर, क्राफ्ट ट्यूब आणि काळजीपूर्वक निवडलेले दशंगामध्ये मध, कोनेरी गेड्डे, तूप,चंदनाचे लाकूड पावडर, गुग्गुला, आगरू, सांब्राणी, देवदारू, लोबन आणि पांढरी मोहरी सोबत कोळसा, जिगट आणि गूळ,परमपारा नावाचा सुगंध अशा नैसर्गिक साहित्यांनी अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. ही अगरबत्ती १८ कारागिरांनी २३ दिवसात तयार केली. ही अगरबत्ती २३ दिवस ५०० मीटरपर्यंत सुगंध पसरविणारी आहे. ही अगरबत्ती मैसूर येथे तयार करून ती मंदिराच्या आवारात आणण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT