flower esakal
मुंबई

Flower Demand : फुलांची मागणी वाढली मात्र आवक घटली; अयोध्या सोहळ्यामुळे फुल मार्केटला फटका

अयोध्येत सोमवारी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दादर येथील फूल बाजारात फुलांची मागणी वाढली आहे.

जीवन तांबे

मुंबई - अयोध्येत सोमवारी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दादर येथील फूल बाजारात फुलांची मागणी वाढली आहे. मात्र बहुतांश फुल उत्पादक शेतकरी, व्यापारी त्यांचा माल अयोध्येला पाठवत असल्यामुळे बाजारात फुलांची आवक ३० ते ४० टक्क्याने कमी झाली आहे. त्यामुळे फुलांच भाव गगनाला भिडले आहेत.

महाराष्ट्रात गणेशोस्तव, दसरा व दिवाळी हे मोठे सण आहेत.या सणाला फुलांची खुप मोठी मागणी असते. मात्र पहिल्यांदा अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्यामुळे फुल मार्केटमध्ये तेजी आली आहे. सोमवारी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी, मंदिर तसेच घरोघरी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे फुल खरेदीसाठी मागणी वाढली आहे.

मात्र फुल मार्केटमध्ये विविध राज्यातून येणाऱ्या फूलांची आवक कमी झाली आहे. कारण बहुतांश फूल उत्पादक शेतकऱ्यांनी माल राममंदिरच्या सजावटी करिता अयोध्येला वळवला आहे. दुसरी बाब म्हणजे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे फुलांची वाढ कमी होत आहे. या सर्व कारणामुळे फुलांची आवक ४० टक्क्याने कमी झाली असून गेल्या चार दिवसापासून सर्व प्रकारच्या फुलांचे दर मात्र भरमसाठ वाढले आहे.

फुलांचे दर वाढल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. शिवाय माळ, हार, फुलांचे बुके तयार करण्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या झेंडूची फुलांचे दर प्रतिकिलो १०० रुपयावर पोहोचले आहे. चमेली व मोगरा 1200 ते 1500 रुपये प्रतिकिलोने मिळत आहेत.

अयोध्येच्या कार्यक्रमामुळे फूल बाजारात आवक कमी झाली आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त आहे. त्यामुळे फुलांचे दर वाढले आहेत.

- रविंद्र इजीप, मालक, अशोक फ्लॉवर

अजून चार ते पाच दिवस फुलांचे दर चढे राहणार आहे. पुढच्या दोन दिवसात किती आवक वाढेल व किती खप होइल यावर फायद्याचे गणित अवलंबून आहे.

- सुरेंद्र जाधव, फूल व्यापारी

फुलांचे दर आमच्या अवाक्याबाहेर आहेत.एरवी अतिशय स्वस्त मिळणारी फुले चढ्या दरात विकणे सुरु आहे.

- सुनीता व्हावळ, ग्राहक

फुलांचे दर भिडले गगनाला

प्रतिकिलो दर

झेंडू -१०० रुपये

जूई- ८०० ते १२०० रुपये

अबोली - ४८० रुपये ५०० रुपये

कन्हेरी - ६०० रुपये

मोगरा- १२०० रुपये

लाल चमेली - १२०० रुपये

सफेद चमेली - १२०० रुपये

शेवंती- 160 ते 200 रुपये

गुलाब हार. एक नग 200 रुपये

गुलाब 20 नग 150 रुपये

कमळ फूल- 40 रुपये नग, डजन- 500रुपये

सोन चाफा शंभर नग- 300 रुपये

जास्वंदी- 6 नग 20 ते 50 रुपये

तरड़- हार एक नग -500 रुपये

गोंडा तोरण- 1 मिटर - 100 रुपये

साधी वेणी - एक नग- 50 रुपये

तुळस एक नग- 20 रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी परिवाराच्या आड कधी राजकारण आणलं नाही मात्र... राज ठाकरेंनी 'ती' खदखद बोलून दाखवली!

Sports Bulletin 10th November: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा ते ऋषभ पंतबाबत CSK च्या सीईओने दिली प्रतिक्रिया

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील मतदारांच्या मनात काय? नागरिकांना ५ दिवसांआड पाणी अन् व्यापाऱ्यांना पार्किंगची अपेक्षा; विडी उद्योगातील महिलांना मुला-मुलींच्या भविष्याची चिंता

Sharad Pawar: संघटनेत सक्रिय राहून पक्ष बांधणी करणार!

कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत! ओल्या कांद्याच्या भावात ६०० रुपयांची घसरण; प्रतिक्विंटल २६०० रुपयांचा सरासरी भाव; अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

SCROLL FOR NEXT