Mumbai Life Sakal
मुंबई

'तो' पर्यंत मुंबई राहणार लेव्हल ३ मध्येच

BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणतात....

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईचा आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट (mumbai positivity rate) साडेपाच टक्क्यांवरुन ४.४०% वर आला आहे. मात्र, तरीही मुंबई लेव्हल तीन मध्येच राहणार आहे. नव्या निकषानुसार पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के किंवा त्यापेक्षा खाली असेल, तर ते शहर किंवा जिल्हा लेव्हल एक मध्ये येते. लेव्हल एक म्हणजे सर्वच अनलॉक. (unlock) तिथे जाचक निर्बंध नसतात. या नव्या निकषानुसार मुंबई आता लेव्हल एकमध्ये आलीय. तरीही मुंबईला लेव्हल तीनमध्ये (Mumbai level 3) ठेवण्यात येणार आहे. (For how long mumbai will be in under level 3 Bmc commissioner Iqbal Chahal replyed)

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात मागच्या आठवड्यात होते, तसेच निर्बंध कायम राहणार आहेत. पुणे शहर अनलॉकच्या पुढच्या टप्प्यावर जात लेव्हल ३ मधून लेव्हल २ मध्ये गेले आहे. पुण्यात ५० टक्के क्षमतेने मॉल उघडायला परवानगी देण्यात आलीय. पण दुकाने, मॉल आणि हॉटेल्सवर वेळेचे निर्बंध कायम असतील. मुंबई महानगर क्षेत्रात वसई-विरार, मीरा-भाईंदर लेव्हल ३ मधून लेव्हल २ मध्ये जाणार आहेत. कल्याण-डोंबिवली लेव्हल तीनमध्ये राहणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

"जो पर्यंत प्रतिदिन कोरोना रुग्णांची संख्या १०० ते २०० पर्यंत येत नाही, तो पर्यंत मुंबई लेव्हल ३ मध्येच राहिलं" असं महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं. "सध्या दर दिवसाला ७०० ते ८०० कोरोना रुग्ण आढळत आहे. पुन्हा मुंबईत लॉकडाउन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही सावधतेने पावलं उचलत आहोत. जून अखेरपर्यंत आम्ही बारकाईने परिस्थितीचे निरीक्षण करु, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ" असे इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. पुढील आदेशापर्यंत मुंबई लेव्हल तीन मध्येच राहणार आहे.

सध्या तरी चालू नियमांमध्ये कोणताही बदल नाही करण्यात आला नाहीये. हा पॉझिटीव्हिटी रेट स्थिर असेल तर नियम बदलण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, सध्या तरी पॉझिटीव्हीटी दर घसरल्यानंतर देखील मुंबईला लेव्हल तीनचेच निकष लागू असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT