मुंबई

8 वर्षीय मेहुणीवर बलात्कार करणाऱ्याला सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा


नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती.


या गुह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या करळ भागात राहावयास असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी नूर आलम जमशेद शेख हा पीडित मुलीचा मेव्हणा आहे. आरोपी नूर आलम याने ऑक्‍टोबर 2018 मध्ये पीडित मुलीवर आपल्या घरात लैंगिक अत्याचार केले होते. त्या वेळी न्हावा-शेवा पोलिसांनी आरोपी नूर आलम याच्यावर बलात्कारासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर न्हावा-शेवा पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.


या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयात सुरू होती. खटल्यामध्ये एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात पंच डी. डी. पाटील, एस. एस. गायकवाड, रासायनिक विश्‍लेषक व वैद्यकीय अधिकारी डॉ. ठमके त्याचप्रमाणे महिला पोलिस उपनिरीक्षक चिवटे या साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ऍड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद तसेच दाखल केलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून बुधवारी अलिबाग सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी आरोपी नूर आलम याला 20 वर्षे सक्तमजुरीची तसेच 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेशसुद्धा न्यायालयाने या वेळी दिले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT