मुंबई

शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावर तुरुंगात असलेल्या प्रदीप शर्मांचा फोटो

मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली.

संदीप पंडित

विरार: विरार मध्ये प्रमोद दळवी (virar pramod dalvi) यांनी सुरु केलेल्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावर (shivsena office) तळोजा जेल मध्ये असलेल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (pradeep sharma) यांचा फोटो लावल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. दळवी हे नालासोपारा (Nalasopara) विधानसभा मतदार संघाचे संघटक असल्याने ही बाब विशेष मानली जात आहे. नालासोपारा मतदार संघातून शिवसेनेने आयत्यावेळी नालासोपाराचे बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात प्रदीप शर्मा यांना निवडणुकीत उतरविले होते.

परंतु त्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते नालासोपारा मतदार संघात फिरकलेही नव्हते. प्रदीप शर्मा यांचा उजवा हात म्हणून प्रमोद दळवी यांना ओळखले जाते. त्यांनी सुरु केलेल्या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावर प्रदीप शर्मा यांचा फोटो झळकल्याने शिवसैनिकांमध्ये मात्र चर्चा सुरु झाल्या आहेत.

वसई तालुक्यात स्थानिक शिवसैनिक विरुद्ध बाहेरचे असा वाद असून आज ही येथील शिवसैनिकांना ठाण्याचे नेतृत्व नको आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक प्रमोद दळवी यांना लांब ठेवत असल्याचे बोलले जात आहे. मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली असून सध्या ते एनआयएच्या कोठडीत आहेत.

तर प्रमोद दळवी शिवसेना नालासोपाारा विधानसभा संघटक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचीही गेल्या महिन्यात ईडीने चारवेळा चौकशी केली होती. असे असताना शिवसेनेला अडचणीचे ठरणाऱ्या प्रदीप शर्मा यांचा फोटो बॅनरवर लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या बाबत पालघर जिल्ह्याचे संपर्क नेते आमदार रवींद्र फाटक यांना या बाबत विचारले असता अगोदर त्यांनी हा जुना फोटो असेल असे सांगितले, तर नंतर मात्र याबाबत आपल्याला माहिती नसून माहिती घेऊन सांगतो असे सांगितल्याने शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत बविआला पराभूत करून पालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न बघणाऱ्या शिवसेनेला प्रदीप शर्मा यांच्या फोटोचा फायदा होतो की, नुकसान हे येणाऱ्या काही दिवसात दिसून येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धाराशिवमध्ये पोलीस अन् बुलढाण्यात मुख्याध्यापकाचा झेंडावंदनावेळी मृत्यू, अचानक कोसळले खाली

Mexico Firing : फुटबॉल सामन्यावेळी बेछूट गोळीबार; ११ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी

पाकड्यांची मस्ती काही जात नाही! T20 World Cup स्पर्धेसाठी संघ जाहीर केला; तरी म्हणतात, आम्ही खेळूच असं नाही...

बापरे! मराठमोळ्या रिलस्टारचं निधन, प्रथमेश कदमच्या जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का, आई-मुलाची होती सुपरहिट जोडी

Chakur News : अपघाताने हिरावला हात, प्रेमाने दिली साथ; प्रीती कानवटे-दिनेश जाधव यांचा विवाह ठरतोय प्रेरणादायी

SCROLL FOR NEXT