Forest sakal media
मुंबई

नवी मुंबईतील शहरातील वृक्षसंपदा वाढणार; ४७ हजार देशी रोपांची लागवड

सकाळ वृत्तसेवा

वाशी : नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal corporation) स्वच्छतेबरोबरच हरित विकासाकडेही लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील वृक्षसंपदा वाढविण्यावर (Tree plantation) महापालिकेने भर आहे. मोकळ्या भूखंड हिरवेगार करण्यासाठी जपानच्या धर्तीवर मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल निर्मितीवर (Forest creation) भर दिला जात आहे. गतवर्षी कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात ४२ हजार व गणपतशेठ तांडेल मैदान परिसरात ५ हजार अशा प्रकारे ४७ हजार देशी रोपांची (Tree) मियावाकी स्वरूपांत लागवड करण्यात आली आहे.

यापुढील काळात कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात २२ हजार, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे ८० हजार व इतरत्र १४ ठिकाणी ७० हजार अशा प्रकारे १ लाख ७२ हजार रोपांची मियावाकी स्वरूपात लागवड करण्यात येणार आहे.यंदा वृक्ष प्राधिकरणासाठी अर्थसंकल्पात ३८ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात मियावाकी पद्धतीने कमी जागेत दाट घनतेची शहरी जंगले उभारण्यात येत आहेत. तसेच यंदा सायन-पनवेल महामार्गालगत देशी प्रजातींच्या वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ३९२ हून अधिक उद्याने, रस्ते दुभाजक व मोकळ्या जागी पर्यावरणाची जोपासना केली जात आहे.

वृक्षसंपदा वाढीसाठी विविध उपक्रम

- झाडांचे संरक्षण, वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, पावसाळ्‌यात उन्मळून व तुटून पडणाऱ्या वृक्षांची विल्हेवाट लावणे याकरिता दोन कोटींची तरतूद.
- शहरात हरितपट्टे निर्माण करण्याचा मानस असून त्याकरिता ६ कोटींची तरतूद केली आहे. याद्वारे स्थानिक प्रजातींच्या ५० हजार वृक्षांची लागवडीचे नियोजित.
- खारफुटी जंगल लागवड व संवर्धन करण्याकरिता २० लाखांची तरतूद.
- रोपवाटिका विकसित करण्यासाठी दीड लाखांची तरतूद. याद्वारे २ रोपवाटिका विकसित करण्याचे नियोजित आहे.
- वृक्ष गणनेसाठी अडीच लाखांची तरतूद. जास्त क्षेत्रफळाच्या आरक्षित भूखंडावर औषधी वनस्पती उद्यान, बांबू उद्यान तसेच कॅक्टस उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटींची तरतूद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT