मुंबई

सपासप चालल्या कुऱ्हाडी, ४२ झाडांचा खातमा, पालिका म्हणते 'आम्हाला काहीच माहिती नाही..'

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : ग्राहकांची विजेची गरज लक्षात घेत नवीन पनवेल सेक्‍टर १५ येथील भूखंड क्रमांक ६५ वर उभारण्यात येत असलेल्या सबस्टेशनच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली आहे. सबस्टेशन उभारणीत अडथळा ठरत असलेले भूखंडावरील ४२ वृक्ष हटवण्याचे काम करण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पनवेल परिसरातील लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत देखील वाढ होत असल्याने नवीन पनवेल येथे उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आले आहे. या भूखंडाचे हस्तांतरण महापारेषण विभागाकडे करण्यात आले असून, महापारेषण विभागाच्या वतीने या ठिकाणी २२० बाय २२ केबी क्षमतेच्या उपकेंद्राचे काम सुरु करण्यात आले आहे.

पालिका प्रशासन अनभिज्ञ
पालिका हद्दीत  केलेली वृक्षतोडीबाबतची माहिती पालिका प्रशासनाला देण्यात आली नाही; मात्र वृक्षतोड करताना पालिकेची परवानगी आवश्‍यक असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांनी दिली.

प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांना दुसऱ्या ठिकाणी लागवड करताना असे वृक्ष दुसऱ्या ठिकाणी बहरतील का, याचा अनेकदा अभ्यास केला जात नसल्याचे पाहायला मिळते. 
- अर्चना कुळकर्णी, शहर संघटिका, शिवसेना महिला आघाडी.

forty two trees were cut for establishment of 220 by 20 kb power plan :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT