मुंबई

सर्वच एकदम फिल्मी मात्र तेवढंच भयावह, मीरा रोडमध्ये घडली धक्कादायक घटना

सुमित बागुल

मुंबई : मुंबईतील उपनगर असलेल्या मीरा रोडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आपण मुंबई राहतो की UP मध्ये असा प्रश्न अनेकांना पडलाय. दिवसाढवळ्या चार माणसं हातात हत्यारे घेऊन येतात काय आणि बंदुकीच्या धाकाने दागिन्यांचं संपूर्ण दुकान लुटतात काय. सर्वच एकदम फिल्मी मात्र तेवढंच भयावह. 

मीरा रोडमधील एस कुमार सोने आणि हिऱ्यांच्या दुकानात दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडलाय. यामध्ये या दुकानातून चोरटयांनी तब्बल दोन कोटी रुपयांचं सोनं नाणं आणि हिरे लुटून नेले आहेत. हा सगळा भीषण प्रकार CCTV  कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. 

मीरा रोडमधील पोलिस उपायुक्त अमित काळे यांच्या माहितीनुसार चार दरोडेखोर बाईकने दुपारी दोन वाजताच्या सुमारास दुकानात आलेत. दुकानात गेल्यावर आपल्या बॅगा काढेपर्यंत दुकानामधील सेल्समनला त्यांनी बोलण्यात गुंतवून ठेवलं. यानंतर घडली धक्कादायक घटना. या चार अज्ञात व्यक्तींपैकी एका व्यक्तीने थेट रोव्हॉल्व्हर काढून मालकाच्या कानपट्टीवर ठेवली. यानंतर इतरांनीही  रिव्हॉल्व्हर काढून दुकानातील काम करणाऱ्यांवर रोखली आणि संपूर्ण दुकान लुटलं. दुकान लुटून हे चारही अज्ञात तिथून पसार झालेत.  

दरम्यान, पोलिसांकडून या चार अज्ञांतांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. मीरा रोड पोलिस याबाबत पुढील तपास करत आहेत. 

four armed men looted jewelry shop in mira road police investigation underway

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT