बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून आलो, सात महिलांना अटक! 
मुंबई

बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून आलो; सात महिलांना अटक!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोपरखैरणेतील बोनकोडे गावातील समता नगर भागात बेकायदा वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी महिला व त्यांच्या 3 अल्पवयीन मुलींना मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने मंगळवारी (ता.4) पहाटे अटक केली. या कारवाईत पकडण्यात आलेल्या सर्व बांगलादेशी महिला या बांधकाम साईटवर, तसेच घरकाम करून राहत असल्याचे तपासात आढळून आले. 

कोपरखैरणे भागात काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बेले व त्यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे कोपरखैरणे पोलिसांच्या मदतीने कोपरखैरणेतील बोनकोडे गावातील समता नगर येथील गोदाबाई निवास इमारतीतील 503 क्रमांकाच्या संशयित घरावर छापा मारला. यावेळी या घरात यास्मिन मुमताज शेख (45) व तिची 17 वर्षीय मुलगी, त्याचप्रमाणे राबिया अनिस शेख (35) व तिच्या दोन अल्पवयीन मुली राहत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. 

त्यानंतर पोलिसांनी त्याच भागातील 787 क्रमांकाच्या घरावर छापा मारून त्याठिकाणी राहणाऱ्या अमिना मोहम्मद मिर्झा (30), गोले मोहम्मद इमाम शेख (30) या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. कोपरखैरणे पोलिसांनी या महिलांकडे त्यांच्या मूळ गावाबाबत विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांच्या दबावानंतर त्यांनी बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून बेकायदा भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी अधूनमधून आपल्या मूळ गावी जात-येत असल्याचेही सांगितले. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने चारही महिलांवर कोपरखैरणे पोलिस ठाण्यात पारपत्र अधिनियम 1920 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ११० हून अधिक पर्यटक अडकले; मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याशीही संपर्क तुटला..

Nigdi BSNL Duct: चुलत भावासमोरच दोघांचा गुदमरून मृत्यू; निगडी प्राधिकरणातील घटना, गर्भवती पत्नी अन् चिमुकल्या लेकरांना सोडून मनोजचा अंत..

Sugar Rates: ६४०० रुपयांवर गेलेली साखर अचानक ४८०० वर! नेमकं आठवडाभरात काय घडलं?

Marathi News Live Updates : देवभूमी नेपाळ जलप्रलयातील मृतांची संख्या पोहोचली 359 वर; दीड हजारांपेक्षा अधिक नागरिक अद्याप बेपत्ता

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! ३९२ जणांचा मृत्यू, १५०० बेपत्ता; २९० भारतीयांशी संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT