मुंबई

मध्य रेल्वेमार्गावर लांब पल्ल्याच्या आणखी चार विशेष गाड्या; 13 ऑक्‍टोबरपासून आरक्षण सुरू

प्रशांत कांबळे

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या आठ मार्गांनंतर नागपूर, पुणे, सोलापूर आणि गोंदियादरम्यान मध्य रेल्वेतर्फे पाच गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आणखी चार गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नांदेड विशेष गाडीच्या थांब्यात बदल करण्यात येणार आहे. 

02519 व 02493 वातानुकूलित विशेष आणि 02221 व 02263 दुरांतो विशेष गाड्यांचे बुकिंग 13 ऑक्‍टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे. पुणे- हावडा आणि पुणे- हजरत निजामुद्दीन विशेष दुरांतो गाड्यांसाठीचे तिकीट कॅटरिंगचे शुल्क वगळून आकारले जाईल. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांना बोर्डिंगच्या वेळी, प्रवासादरम्यान आणि नियोजित ठिकाणी कोव्हिड- 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. 

नव्याने सुटणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या 

- लोकमान्य टिळक टर्मिनस - कामाख्या वातानुकूलित साप्ताहिक विशेष (15 ऑक्‍टोबरपासून कामाख्या येथून दर गुरुवारी सुटेल). 02519 वातानुकूलित विशेष रेल्वे 18 ऑक्‍टोबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी सुटेल 
- पुणे- हावडा दुरांतो द्वि-साप्ताहिक विशेष (15 ऑक्‍टोबरपासून हावडा येथून प्रत्येक गुरुवार आणि शनिवारी सुटेल). 02221 दुरांतो विशेष रेल्वे 17 ऑक्‍टोबरपासून दर सोमवार व शनिवारी पुणे येथून सुटेल 
- पुणे- हजरत निजामुद्दीन वातानुकूलित साप्ताहिक विशेष (16 ऑक्‍टोबरपासून हजरत निजामुद्दीन येथून दर शुक्रवारी सुटेल). 02493 वातानुकूलित विशेष रेल्वे 18 ऑक्‍टोबरपासून पुणे येथून दर रविवारी सुटेल. 
- पुणे- हजरत निजामुद्दीन दुरांतो द्वि-साप्ताहिक विशेष (15 ऑक्‍टोबरपासून हजरत निजामुद्दीन येथून दर सोमवार आणि गुरुवारी सुटेल). 02263 दुरांतो विशेष रेल्वे 16 ऑक्‍टोबरपासून दर मंगळवार आणि शुक्रवारी पुणे येथून सुटेल. 
--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT