Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेवरील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. या पुलाचा रेल्वे रुळांवरून जाणारा भाग हटवण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तीन ते चार मेगाब्लॉक घ्यावे लागणार असून रेल्वे प्रशासनाने नियोजन सुरू केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पुलाच्या लोखंडी तुळई, पोलादी सांगाडा आणि काँक्रीटचा भाग हटवण्यासाठी दाेन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. या कामासाठी मोठ्या क्रेन, गॅस कटिंग मशीन आणि सुरक्षेसाठी तांत्रिक कर्मचारी तैनात राहणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच हा मेगाब्लॉक घेणे गरजेचे ठरणार आहे.
मेगाब्लॉक दरम्यान काही लोकल रद्द होतील, काहींचे मार्ग बदलले जातील, तर काही गाड्या ठरावीक स्थानकांवरच थांबवल्या जातील. जलद व धीम्या दोन्ही मार्गांवर याचा परिणाम होणार आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत घोषणा, ॲप्स आणि सोशल मीडियावरील अपडेट लक्षात घ्यावेत. पर्यायी मार्गांचा वापर करणे सोयीचे ठरेल.
पूल पूर्णपणे पाडण्यासाठी किमान तीन ते चार मोठे मेगाब्लॉक लागतील.
प्रत्येक ब्लॉक साधारण चार ते सहा तासांचा असेल.
तयारीसाठी रात्री उशिरा काही छोटे रात्रीकालीन ब्लॉकही घेण्यात येतील.
एल्फिन्स्टन पूल ६० दिवसांत पाडण्यात येणार आहे. दसरा-दिवाळीच्या प्रवासी गर्दीचा विचार करून रेल्वेमार्गांवरील ब्लॉक सणानंतर घ्यायचा की नवरात्रीदरम्यानच सुरू करायचा, याबाबत रेल्वे प्रशासनाचे नियोजन सुरू आहे.
एल्फिन्स्टन रोड पूल पाडकामामुळे बेस्ट प्रशासनाने ११ बसमार्ग वळवले गेले; मात्र या बदलांची माहिती बेस्ट प्रशासनाने उशिरा जाहीर केल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. शनिवारी (ता. १३) सकाळपासून कामावर, शाळा-काॅलेजला जाणाऱ्या हजारो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी रात्रीच पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच बससेवा वळवण्यात आल्या.
ए-१६२ बसमार्ग - जगन्नाथ भाटकर रोड (एल्फिन्स्टन पूल)-मडकेबुवा चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड-कृष्णा देसाई चौक (भारतमाता)-महादेव पालव रोड (करी रोड पूल)-एन. एम. जोशी मार्ग-दीपक सिनेमा-जगन्नाथ भाटकर रोड.
१६८ बसमार्ग - करी रोड पूलमार्गे जाणार
ए-१७७ बसमार्ग - मडकेबुवा चौक येथे थांबवला जाईल व हिंदमाता सिनेमापर्यंत वाढवण्यात आला आहे
२०१ बसमार्ग - आता परळ एसटी डेपो/संत रोहिदास चौक येथेच संपणार.
मार्ग क्रमांक १४, ५७, ४४, ५०, ५२, १६२, १६८ - करी रोड पूल बंद झाल्याने या सर्व बस आता चिंचपोकळी पुलावरून वळवण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.