संग्रहित छायाचित्र 
मुंबई

गाडी घेऊन बाजारात जाताय? दंड होईल!

सकाळवृत्तसेवा

मुंबई : बाजारात गाडी घेऊन जात असाल तर थांबा. घाटकोपर परिसरात चारचाकी रस्त्यावर आणण्यास बंदी करण्यात आली आहे. किरकोळ कारणासाठी कार घेऊन फिरत असल्यास किमान 500 ते 1000 रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का? : आता कोरोना रुग्णांच्या तपासासाठी वापरण्यात येणार कॅप्सूल बुथ 

मुंबई महापालिकेच्या एन प्रभागात गुरुवारी (ता. 16) प्रशासन, पोलिस आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत पोलिसांनी बाजारातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. बाजारात गरज नसताना नागरिक चारचाकी घेऊन येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे चारचाकी वापरण्यावर निर्बंध आणावेत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीत ठरल्यानुसार बाजारात चारचाकी वाहने घेऊन येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

महत्त्वाचं : मुंबईकरांनो... तुम्ही कोरोनाच्या `या` स्टेजमध्ये

खवय्यांना दिलासा 
केंद्र आणि राज्य सरकारने मासेमारीला परवानगी दिली आहे. मात्र, मासे विकायचे कोठे, असा प्रश्न विक्रेत्यांपुढे होता. पण, घाटकोपरमध्ये मासळी बाजारात मासेविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मासळी बाजार आणि मटणविक्रीची दुकाने सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

रेशन दुकाने बारा तास सुरू 
रेशनची दुकाने सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, घाटकोपरमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यातच एखाद्या रेशनच्या दुकानात गर्दी झाल्यास नजिकच्या पालिका शाळेत दुकानाला जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT