मुंबई

लहान मुलांवर लक्ष ठेवा, चार वर्षांच्या मुलाचा लिफ्टमध्ये अडकून गेला जीव

अनिश पाटील

मुंबईः  धारावीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. लिफ्टच्या अपघातात शनिवारी चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. बहिणीसोबत लिफ्टमध्ये गेला असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी स्थानिक शाहू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहेत. 

मोहम्मद हुजैईफा शेख असं या मुलाचं नाव आहे. धारावी क्रॉस रोड येथील घोशी शेल्टर येथील इमारतीत हा अपघात झाला. मृत मुलगा बहिणीसोबत लिफ्टमधून उतरत असताना लिफ्टच्या दोन दरवाज्यांमध्ये अडकला. त्यानंतर लिफ्ट सुरू झाल्यानंतर चिरडून त्याचा मृत्यू झाला. चिमुकल्याचा मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून सीसीटीव्हीच्या तपासणीत लिफ्टमध्ये अडकूनच मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील धारवी परिसरात शाहूनगर पोलिस ठाण्यात अंतर्गत कोझी शेल्टर नावाच्या इमारतीमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी शाहू नगर पोलिस अधिक तपास करत आहेत. मुलांनी लिफ्टमधून जाताना एकाहून अधिक मजल्यांचे बटण दाबले होते. मुलाची बहिण बाहेर पडल्यानंतर हा मुलगा दरवाज्यात अडकला. त्यानंतर लिफ्ट सुरू झाल्यामुळे तो दोन दरवाजांमध्ये अडकून चिरडला गेला, असे एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Four year old boy dies after getting stuck in elevator door at Dharavi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT