मुंबई

''या'' स्मार्टसिटीचे चार वर्षात एकही काम पूर्ण नाही 

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटीमध्ये निवड होऊन चार वर्षे होत आहेत; मात्र अद्याप एकही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे केवळ स्मार्ट सिटीच्या चर्चेचे गुऱ्हाळ चालत असून प्रत्यक्ष विकास कधी दिसणार, असा सवाल केला जात आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्मार्ट सिटी प्रकल्पात सन 2016 मध्ये समावेश झाला. 24 प्रकल्पांची यादी तयार करण्यात आली. यात अनेक कामांची घोषणा झाली असली, तरी केवळ चार वर्षांत सिटी पार्क आणि पालिका मुख्यालयामध्ये सिग्नल आणि सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोल रूमच्या कामाला सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटीचा 1 हजार 445 कोटीचा प्रकल्प प्रस्ताव सादर केला होता. त्याला सन 2016 मध्ये सरकारने मंजुरी दिली.

स्मार्ट सिटीच्या अंतर्गत एरिया बेस व पॅन सिटी या दोन प्रकारांत करण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांपैकी केवळ सिटी पार्कच्या कामाला सुरुवात झालेली आहे. सिटी पार्कप्रमाणेच स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण रेल्वेस्थानक परिसराचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याला कोट्यवधी रुपये खर्च होणार असून निविदा आणि पुढील चर्चेमध्ये गाडी थांबली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारची 2022 ची मुदत असून तो राज्य शासनाकडून रद्द होतो का, अशी चर्चा ही रंगली होती. 

निवडणूक सत्ताधाऱ्यांना डोकेदुखी ठरणार 
स्मार्ट सिटीमध्ये पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांची कामे होणे अपेक्षित होते. त्यासाठी पालिकेने दर वर्षी 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद अथवा जमा दाखविणे अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी दूर होणे, शहरातील सुरक्षा, पाणीसमस्या, कचराप्रश्न सोडविणे आदी कामे स्मार्ट सिटीमध्ये आखली असली तरी केवळ चर्चा आणि बैठकांमध्ये स्मार्ट सिटीचे गाडे अडले आहे. नवीन वर्षात 2020 मध्ये स्मार्ट सिटीमधील एक प्रकल्प तरी नागरिकांना मिळेल का, असा सवाल केला जात आहे. यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यात पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून सत्ताधारी पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT