हजला पाठवण्याच्या नावाखाली 47 जणांची फसवणूक; ट्रॅव्हल्स कंपनीविरोधात गुन्हा 
मुंबई

हजला पाठवण्याच्या नावाखाली 47 जणांची फसवणूक; ट्रॅव्हल्स कंपनीविरोधात गुन्हा

अनिश पाटील

मुंबई : हज यात्रेला पाठवण्याच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन 47 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक व मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार फिरोज खान हे रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते वरळी येथील जिजामाता नगर येथे वास्तव्याला असताना त्यांनी हज समितीमार्फत उत्तर प्रदेश येथील त्यांच्या गावावरून अर्ज भरला होता. पण सोडतीत त्यांची निवड झाली नाही. पुढे 2017 मध्ये त्यांचा मुलगा व मुलगी दोघांचेही लग्न ठरले. त्यावेळी त्यांनी नातेवाईकांसोबत उमराहला जाऊन लग्न करण्याचे ठरवले. त्यासाठी नागपाडा येथील खासगी ट्रॅव्हल्स कंपनीला 17 व्यक्तींना हजला नेण्यासाठी चार लाख 20 हजार रुपये आगाऊ दिले.

त्यानंतर उत्तर प्रदेशातील काही नातेवाईकांनीही फिरोज खान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनाही उमराह येथे नेण्यासाठी साडे सात लाख रुपये आगाऊ देण्यात आले. दोन्ही रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आल्या होत्या. दोन्ही व्यवहारांमध्ये चार लाख 20 हजार व सात लाख 50 हजार रुपये ट्रॅव्हल्स कंपनीचा मालक व त्याच्या मुलाकडे देण्यात आले; पण आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीला उमराहला नेण्यात आले नाही. तसेच तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. याप्रकरणी तक्रारदार फिरोज खान यांनी नागपाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास करण्यात येत आहे. 
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT