friend killed friend over Advice not to steal crime mumbai police esakal
मुंबई

Mumbai Crime: चांगला सल्ला देणे पडलं महागात ! मित्राने चिडून केला चाकू हल्ला

उपचारासाठी नेत असतानाही जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वांद्रे भागातील शास्त्रीनगर परिसरात एका मित्राला चोरी करू नको असा सल्ला देणे एका तरुणाला भारी पडले आहे. आरोपी मित्राने या तरुणाच्या पोटात चाकू खूपसून त्याला गंभीर जखमी केले. तसेच उपचारासाठी नेत असतानाही जीवे मारण्याची धमकी दिली.

वांद्रे पोलिसांनी आरोपी इस्माइल इब्राहिम शेख उर्फ चना याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार झिशान खान हे रिक्षाचालक असून त्यांची आरिफ पठाण या तरुणाची चांगली मैत्री आहे. तर शेख हा गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती असून, त्याची या ठिकाणी दहशत आहे. सतत हत्यार घेऊन फिरत असल्याने कोणीही त्याच्या वाट्याला जात नाही.

झिशान खान त्यांचा अजून एक पठाण नावाच्या मित्रासोबत 13 मे रोजी 10 वाजण्याच्या सुमारास वांद्रेच्या जॉगर्स पार्कमध्ये गप्पा मारत बसले होते. तेव्हा त्यांच्या मित्राने आरोपी इस्माईल शेख आणि त्याचा मित्र इजाज त्यांच्या घरी चोरी करताना पकडले गेले मित्राने झिशान खानना सांगितले.

त्यानंतर झिशानने इस्माईल शेखलाही पठाणने तू आपल्या भागात चोरी करतोस आणि तुझ्यामुळे आमचे नाव बदनाम होते असे सांगत चोरी न करण्याची समज दिली होती. संध्याकाळी पठाण हा झिशान खान सोबत असताना शेख त्यांच्याजवळ आला आणि मी कोणत्या परिसरात चोरी करायची हे तु मला शिकविणार का असे म्हणत शिवीगाळ करू लागला. तुला माहीत आहे ना मी या भागाचा दादा आहे असेही बोलल्याने पठाणने शेखकडे माफी मागितली आणि तिथून जाऊ लागला.

आरोपी इस्माईल शेखने सोबत आणलेला चाकू पठाणच्या पोटात घुसवला ज्यात तो गंभीर जखमी झाला. झिशान खान यांनी अन्य मित्रांच्या मदतीने पठाणला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करताना फिर्यादी आणि त्याच्या मित्रांनाही शेखना धमकाविले.

तो तिथून निघून गेल्यानंतर पठाणला भाभा रुग्णाला उपचारासाठी नेण्यात आले व पुढे केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार शेखच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT