वयोवृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करताना नागरिक. 
मुंबई

हीच खरी माणूसकी: मुस्लिमांच्या पुढाकाराने हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मनोर येथील वृद्धाश्रमातील एका वयोवृद्ध महिलेचा रुग्णालयात शनिवारी (ता. ४) मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह मुंबईला घेऊन जाणे शक्‍य नसल्याने मनोरमधील मुस्लिमांनी पुढाकार घेऊन मुलाच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या या नागरिकांचे कौतुक होत आहे.

महामार्गावरील वृद्धाश्रमातील संध्या बिनसाळे ( ८९) या वृद्ध महिलेला उपचारासाठी मनोर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा शनिवारी मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तिचा मुलगा प्रकाश बिनसाळे हा मुंबईहून मनोरला पोहोचला, परंतु लॉकडाऊनमुळे मृतदेह मुंबईला नेणे शक्‍य नसल्याने मनोरलाच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता.

या वेळी मनोरचे सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णवाहिका चालक बिलाल रईस, बिलाल खतीब, फुरकान खतीब, रयान दळवी, फरहान दळवी आणि युसूफ मेमन आदींच्या मदतीने हात नदीवरील स्मशानभूमीत तिच्यावर हिंदू रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले. देश कठीण परिस्थितीतून जात असताना मनोरच्या मुस्लिमांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT