funeral on open land 
मुंबई

स्वातंत्र्याचा सूर्य उगवलाच नाही! स्मशानभूमीअभावी 'इथे' होते मृतदेहांची विटंबना

शामकांत पतंगराव

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील कानवे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या फोफोडी गावाला स्मशानभूमीच नसल्याने मृतदेहांवर उघड्या माळरानावर अंत्यसंस्कार करावे लागतात. उन्हाळा-हिवाळ्यात अंत्यसंस्कार सुरळीत पार पाडता येत असले तरी पावसाळ्यात मात्र नागरिकांना प्लास्टिकची ताडपत्री (प्लास्टिक) लावून अंत्यसंस्कार करावे लागतात. देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षांचा काळ लोटल्यानंतरही फोफोडीकरांना स्मशानभूमीसाठी झगडावे लागत असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. 

किन्हवली जिल्हा परिषद गटातील कानवे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या फोफोडी गावाची लोकसंख्या जेमतेम पाचशेच्या आसपास आहे. या गावात स्मशानभूमीच नसल्याने मृतदेहांवर उघड्या माळरानावर अंत्यसंस्कार करावे लागतात.

स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीकडे 11 गुंठ्यांचा सातबारा आरक्षित असून प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे फोफोडी गावातील कोणाचा मृत्यू झाला तर त्या देहाला अग्निसंस्कार होईपर्यंत मरणयातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही फोफोडीत स्वातंत्र्याचा सूर्यच उगवला नसल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

स्मशानभूमीच्या जागेचा स्वतंत्र 11 गुंठे सातबारा असून मागील वर्षी ऑगस्ट 2019 मध्ये जागेचा सरकारी सर्व्हे करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात जागा घेण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2019 ला ग्रामपंचायतीने पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे जनसुविधा योजने अंतर्गत नवीन स्मशानभूमीचा प्रस्ताव पाठविला असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 
- स्वप्नील भेरे, प्रभारी सरपंच, कानवे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT