कांद्याची लागवड करताना शेतकरी. 
मुंबई

या पिकामुळे शेतकऱ्यांचे चेहरे पांढरे

सकाळ वृत्तसेवा

 अलिबाग ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे गेल्या खरीप हंगामात अलिबाग आणि पेण तालुक्‍यीाल शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता रब्बी हंगामातील या तालुक्‍यांतील महत्त्वाचे पीक असलेला पांढरा कांदाही रोगाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आर्थिक नुकसानीच्या भितीने पांढरे पडले आहेत. बदलत्या हवामानामुळे हे संकट ओढवले आहे. 

खूशखबर : या जिल्ह्यात प्लास्टिक हटवण्यासाठी निधी

अलिबाग तालुक्‍यातील कार्ले, खंडाळे, तळवली, सागाव, मानी, भुते आदी गावांसह पेण तालुक्‍यात रब्बी हंगामात एक हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सफेद कांद्याचे उत्पादन घेतले जाते. चांगल्या प्रतीचा कांदा म्हणून त्याची ओळख आहे. स्थानिक बाजारपेठांबरोबरच राज्यातील अन्य ठिकाणीही त्याला चांगली मागणी आहे. देशभरातून येणारे पर्यटकही तो आवर्जून खरेदी करतात. 

खरीप हंगामातील भातकापणीची कामे झाल्यावर आठ ते दहा दिवसांत सफेद कांद्याची लागवड करण्यात येते. दोन महिन्यांत तो तयार होतो. यंदा मात्र, या पिकाला सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचा फटका बसला; तर डिसेंबर, जानेवारीत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तो पुन्हा संकटात सापडला. बदलत्या हवामानामुळे त्याला मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटकनाशकांच्या फवारणीचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे. 

हे वाचा : अपघातग्रस्त कारबाबत गुढ वाढले

जयेश पाटील या शेतकऱ्याने सांगितले की, कीडरोगामुळे कांद्याचा उत्पादन खर्च निघणे अशक्‍य आहे. 
कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना पत्र दिले असून तातडीने पंचनामे करण्याचे आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे. 

या वर्षी पावसाळा लांबणीवर गेला. त्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. मात्र बदलत्या हवामानामुळे त्याची रोपे मुळापासून कुजू लागली आहेत. त्याचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 
- प्रभाकर नाईक, शेतकरी 

सफेद कांदा मुळापासून कुजू लागला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यंदा उत्पादन घटण्याची भीती आहे. सरकारने कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देऊन भरपाई द्यावी. 
- अशोक घरत, शेतकरी 

बदलत्या हवामानामुळे सफेद कांद्याच्या रोपांवर बुरशीजन्य रोग असल्याचे आढळून आले आहे. तहसीलदारांच्या सूचनेनुसार नुकसानीबाबत पाहणी करून त्याचा अहवाल सरकारला पाठविण्यात येणार आहे. 
- बी. आर. जानुगडे, तालुका कृषी अधिकारी 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

SCROLL FOR NEXT