Eknath shinde banner sakal media
मुंबई

'एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री...' बॅनरबाजीमुळे मंत्री अडचणीत?

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday banner) शुभेच्छाचें सर्वत्र मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, या सर्व बॅनर मधून ठाण्यातील वागळे इस्टेट (wagale estate) परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरची सोमवारी दिवसभर चर्चा रंगली होती. या बॅनरवर एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री आशा (future chief minister eknath shinde) आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आले होते. मात्र, सायंकाळी त्या बॅनरवरील भावी मुख्यमंत्री लिहिलेला मजकूर पुसून टाकण्यात आला.

ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरातील चौकाचौकात नाक्यांनाक्यावर मोठ्या प्रमाणात भले मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, या सर्व बॅनरमधून ठाण्यातील वागळे इस्टेट मधील चेकनाका येथे एकनाथ शिंदे यांनी भावी मुख्यमंत्री शा प्रकारचा बॅनर शिवसैनिकांनी लावल्यामुळे विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी केलेली अहोरात्र मेहनत डोळ्यांनी पाहिल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद त्यांना मिळाले पाहिजे अशी प्रतिक्रिया शिंदे यांच्या चाहते विजय यादव यांनी व्यक्त करत भावी मुख्यमंत्री असा बॅनर लावला असल्याचे सांगितले. विजय यादव हे वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता.

आम्ही सगळे बाळासाहेब यांच्या तालमीतील शिस्तबद्ध शिवसैनिक आहोत आणि आदेशाचे पालन करणारे शिवसैनिक आहोत. मात्र याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक नगरसेवक राम रेपाळे यांच्याशी संपर्क करून भावी मुख्य वगळण्याचे आदेश दिले. त्यांतर राम रेपाळे यांनी बॅनरच्या ठिकाणी जाऊन बॅनरवरील भावी मुख्यमंत्री हा शब्द वगळला. या आधी देखील अशाच प्रकारचा भावी मुख्यमंत्री असा बॅनर लावण्यात आला होता. मात्र आता हा भावी मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आला असला तरी राजकीय वर्तुळात मात्र या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT