Marathon 
मुंबई

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावता-धावताच ते कोसळले अन्...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना एका 64 वर्षीय धावपटूचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे धक्कादायक घटना घडली.

मॅरेथॉनमध्ये धावत असताना हृदय विकाराचा झटका आल्याने ते जागेवर कोसळले, त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गजानन मालजकर (वय 64) असे त्यांचे नाव आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये आज सकाळी मोठ्या उत्साहाने ते सहभागी झाले होते. मुंबई मॅरेथॉनमध्ये सात जणांना हृदयाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कडाक्याची थंडी अनुभवत असलेले हजारो मुंबईकर आज (रविवार) पहाटेच रस्त्यावर उतरले अन् तंदुरुस्तीचा संदेश देत मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. ड्रीम रनमध्ये हजारो स्पर्धकांना सहभाग घेत उत्साह दाखविला. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड कलाकारही उपस्थित होते. 17 व्या मुंबई मॅरेथॉनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT