मुंबई

मुंबईत फुलांचे भाव वधारले, जाणून घ्या दादर मार्केटमधली परिस्थिती

मिलिंद तांबे

मुंबई: दादरमधील मीनाताई ठाकरे फुल मंडई फुलांनी बहरली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून फुल विक्री सुरू आहे. अनेक नागरिक फुलं खरेदीसाठी येत मार्केटमध्ये येताहेत.

गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त अनेक भणेशभक्त खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये येतात. खासकरून दादरच्या फुल मार्केटमध्ये गणेशभक्तांची गर्दी असते. गणेश चतुर्थीच्या अगोदर फुल बाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. मात्र ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ हालचाल करत मंडईत नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. 

दादरच्या मीनाताई ठाकरे मंडईमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नागपूर तसेच बंगळूर येथून फुले विक्रीसाठी येतात. मात्र पाऊस असल्याने यंदा कमी आणि भिजलेला माल जास्त येत आहे. फुले नेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा उत्साह दरवर्षीप्रमाणे आहे. मात्र मंडईमध्ये येणाऱ्या नागरिकांचं तापमान मोजून सॅनिटायईज करून मंडईत पाठवले जाते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून फुल विक्री केली जाते. मालाची आवक कमी असून मागणी जास्त आहे. त्यामुळे फुलांचे भाव वधारलेत, अशी माहिती मंडईचे संचालक दादाभाऊ येणारे यांनी दिली. तसेच येत्या दोन दिवसात हे भाव कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

  • फुल  (किलो)              भाव (रुपयात)
  • पिवळा गोंडा              120 - 150       
  • नामधारी गोंडा            100 - 120
  • कलकत्ता गोंडा           200 - 220
  • शेवंती                       100 -150
  • गुलछडी                    200 - 220
  • कापरी गोंडा               100 - 120
  • अस्टर                        120 - 150
  • लीली (हजार फुले)        300 - 350

(संपादनः पूजा विचारे)

Ganesh festival 2020 Social Distancing Dadar Flower Market

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT