raigad sakal
मुंबई

Ganesh Visarjan : रक्षुनिया सकळा, द्यावी आम्‍हांसी आज्ञा...

भरपावसात गौरी-गणपतीला साश्रुनयनांनी निरोप

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग - पाच दिवस भक्तिभावाने सेवा केल्यानंतर लाडक्या गणरायासह गौराईला निरोप देताना आबालवृद्ध भावूक झाले. शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्‍या संततधारेमुळे गणेशभक्तांची काहीशी तारांबळ उडाली, मात्र उत्साह कायम होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्‍हाला’, अशा जयघोषात रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.

जिल्ह्यात ५८ हजार ६६६ घरगुती, तर १० सार्वजनिक गणरायांचे विसर्जन झाले. पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्‍त ठेवण्यात आला होता. सायंकाळी चारनंतर काही कुटुंबे विसर्जनासाठी निघाली होती. पावसाने सायंकाळीनंतर विश्रांती घेतल्याने अनेकांना विनाअडथळा विसर्जन करता आले. आबालवृद्ध गणपती बाप्पाचा जयजयकार करत मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होती. टाळ-मृदुंगाचा गजर, आणि जाणत्या व्यक्तीच्या डोक्यावर गणेशमूर्ती तर महिला गौराईंना डोक्‍यावर घेत विसर्जन घाटाकडे निघाल्या होत्या.

सामूहिक विसर्जन

कोकणातील गावागावांमध्ये डोक्यावर गणपती घेऊन गावकरी एका रांगेत नदीवरील विसर्जन घाटाकडे निघतात. गुलालाची उधळण, पारंपरिक गाणी आणि टाळ-मृदुंगाच्या गजर करीत गावकरी सामूहिक मिरवणुका काढून विसर्जन घाटावर पोहोचले. शेताच्या बांधावरून निघालेल्‍या मिरवणुकीचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणार होते. नदीकिनाऱ्यावर एकत्र येत गावकऱ्यांनी आरती केली, त्‍यानंतर मूर्तींचे विसर्जन केले.

नद्या तुडुंब भरल्याने सावधगिरीचे आवाहन

कोकणात आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला आहे. त्‍यामुळे नद्या-तलाव ओसंडून वाहत आहेत. त्‍यामुळे विसर्जन करताना खबरदारी घेण्याचे आवाहन स्‍थानिक प्रशासनाकडून करण्यात आले होते. प्रवाहाचा तसेच खोलीचा अंदाज येत नसल्‍याने अनेकांनी किनाऱ्यावरच विसर्जन केले. सामूहिक विसर्जन मिरवणुकांमधून दुर्घटनांचेही प्रमाण टाळता येते.

महिलांचे डोळे पाणावले

गौराईंचे गुरुवारी उत्साहात स्वागत झाले. शुक्रवारी यथेच्छ पाहुणचार करून माहेरवाशिणीला शनिवारी भक्‍तांनी जड अंत:करणाने निरोप दिला. यावेळी घरातील लहान मुले, महिलांचे डोळे पाणावले होते. गणेशोत्‍सवासाठी महिनाभर आधीपासून लगबग सुरू होते. गौरी-गणरायाला निरोप दिल्‍यावर घर रिते होत असल्‍याची भावना अनेकांनी व्यक्‍त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार, जगाला भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल; मोदींचं मोठं स्वप्न!

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT