ganpati  
मुंबई

ठाणेकरांनो! तुम्ही गणेशोत्सवात कमाल केलीत, यंदा फक्त 'इतकं' ध्वनी प्रदुषण

राहुल क्षीरसागर

ठाणे : उत्सवांच्या काळात ठाणे शहरात ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे शहरात अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा, तर काहींनी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाची कमी झालेली संख्या, तसेच मिरवणुकांवर आलेली बंधने, यामुळे गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची मोजण्यात आलेली पातळी केवळ 60 ते 70 डेसिबलच्या दरम्यान असल्याचे दिसले. मागील वर्षी हीच प्रदूषण पातळी 90 ते 95 डेसिबलच्या घरात होती. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषणात घट झाल्याचे दिसून आले. 

यंदा ठाणे शहरातील सुमारे 200 पेक्षा अधिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या वर्षी उत्सवाची संख्या देखील कमी झाली. त्यात ठाणे महापालिका प्रशासनाने देखील गणेश मंडळांना, तसेच घरगुती गणपती बसवणाऱ्यांना नियम आखून दिले. यामध्ये गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपात नसावे, आगमनाच्या आणि विसर्जनाच्यावेळी जास्तीत जास्त तीन लोक असावेत, गणपतीची सजावट पर्यावरणपूरक तसेच कमीत कमी असावी, राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करू नये, गणपतीच्या दर्शनासाठी, तीर्थप्रसाद व महाप्रसादासाठी गृहभेटी टाळाव्यात, शक्‍यतो घरीच श्रीगणेशाची आरती करून विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन करण्यात यावे, आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

मोठ्या गृहसंकुलाच्या ठिकाणी त्यांच्या संकुलातील गणेशमूर्तींचे विसर्जन सिंटेक्‍सच्या मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्याने या वर्षी गौरी-गणपतीच्या विसर्जन मिरवणुकादेखील साध्या पद्धतीनेच निघाल्या. त्यामुळे ध्वनिप्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून आले. दरम्यान, मागील वर्षी वर्षी गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी ढोल-ताशे, डीजे, बॅंजो आदी वाद्यांचा वापर करण्यात आल्याने ठाण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण पातळी 95 डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले होते. मात्र, यंदा हीच पातळी 70 डेसिबलपेक्षा अधिक नसल्याची माहिती दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर यांनी दिली. 

(संपादन : वैभव गाटे)

in ganeshotsav 60 to 70 decibels sound pollution in thane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT